जगातील सर्वात सेफ विमान! बाप लेकीचा क्युट Video पाहून तुमचा मूड होईल फ्रेश

बाप-लेकीचं नातं सर्वात खास असतं. त्यात मुलगी लहान असेल तर तिच्यासाठी 'काय करु आणि काय नाही' असं तिच्या वडिलांना होतं.

जाहिरात
Read Time: 2 mins
बाप-लेकीचा हा गोड व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय.
मुंबई:

Pilot Dad Proudly Introduces Baby Daughter: बाप-लेकीचं नातं सर्वात खास असतं. त्यात मुलगी लहान असेल तर तिच्यासाठी 'काय करु आणि काय नाही' असं तिच्या वडिलांना होतं. बाप-लेकीच्या प्रेमळ नात्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तुम्हाला कितीही टेन्शन असेल तरी हा व्हिडीओ पाहा. तो पाहिल्यानंतर तुमचा मूड नक्की फ्रेश होईल.

या व्हिडीओमध्ये आपल्या लहान मुलीला खूश करण्यासाठी तिच्या बाबांनी स्पेशल अनाऊन्समेंट केलीय. बाप आणि मुलीचं नातं दाखवणारा हा 

पायलट वडिलांची अनाऊन्समेंट  (Father Daughter Adorable Video)

साऊथ वेस्ट एअरलाईन्समधील पायलटचा हा व्हिडीओ आहे. हा पायलट मुलीला घेऊन विमानात आला होता. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओनुसार या पालटचे नाव बेन आहे. त्यानं मुलीला कडेवर घेतलंय. 'मी तुमचा फर्स्ट ऑफिसर बेन बोलतोय जो तुम्हाला डेनवरपर्यंत घेऊन जाणार आहे. माझ्यासोबत माझी छकुली मिली 'एली रोज' देखील आहे. ही माझी मुलगी आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे फ्लाईट खूप खास आहे. मी एक पायलट म्हणून तिच्याबरोबर पहिल्यांदाच उड्डाण करणार आहे.' 

बेन पुढं म्हणाला की, 'एली ही नेहमी आनंदी राहणाऱ्या मुलगी आहे. ती फक्त 10 टक्के वेळा त्रास देते. मला आशा आहे की 90 टक्के वेळा आनंदी राहणारी मुलगी असेल, तसं झालं नाही तर तुम्ही तिच्या आईला दोष द्या.'
 

यहां देखें वीडियो

Advertisement

सर्वात सेफ विमान (father daughter cute video)

वडिल आणि मुलीचा हा गोड व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. साऊथ वेस्ट एअरनं हा व्हिडीओ पोस्ट केलाय. तो पाहून एका युझरनं लिहलंय, 'ही जगातील सर्वात सेफ फ्लाईट असेल.' सुंदर लहान मुलगी, सुंदर कुटुंबं... या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडीओवर युझर्सनं दिल्या आहेत.