कझाकिस्तानच्या अक्ताऊ शहराजवळ एक प्रवासी विमान कोसळल्याची घटना समोर आहे. अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अझरबैजान एअरलाइन्सचं हे विमान होतं.
पाहा VIDEO
मिळालेल्या माहितीनुसार, विमानात क्रू मेंबरसह 72 प्रवासी प्रवास करत होते. अपघातापूर्वी विमानाने अक्ताऊ विमानतळावर अनेक वेळा घिरट्या मारल्या. तांत्रिक बिघाडामुळे विमानाने इमर्जन्सी लँडिंग करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.