AI मुळे नोकऱ्या जाणार नाहीत तर मिळणार! PM मोदींनी जगाला समजावून सांगितलं

PM Modi Speech on AI : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी (11 फेब्रुवारी 2025) फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये झालेल्या AI कृती परिषदेला संबोधित केले.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी (11 फेब्रुवारी 2025) फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये झालेल्या AI कृती परिषदेला संबोधित केले.  आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयमुळे नोकरी जाणारा ही सर्वात मोठी भीती आहे. त्यावर मात कशी करणार याचा उपाय पंतप्रधानांनी यावेळी सांगितला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

AI आणि मानवतेचा कोड

पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की, AI पूर्वीपासूनच आमची अर्थव्यवस्था, सुरक्षा आणि आमच्या समाजाला नवा आकार देत आहे. AI या शतकात मानवतेचा कोड लिहित आहे. AI आज काळाची गरज आहे. आमच्याकडं जगातील सर्वात मोठी गुणवत्ता आहे. आम्ही लोकांचा डाटा सुरक्षित ठेवण्याचा व्यवस्थ उभारली आहे. AI चं भविष्य उज्ज्वल आहे. काही जण मशिनची शक्ती वाढल्यानं काळजीत आहेत. पण, हा काळजीचा विषय नाही. 

पंतप्रधान मोदींनी सांगितलं की, AI मुळे अनेक रोजगारांच्या संधी निर्माण होत आहे. AI मानवतेचा कोड लिहित आहे. AI मुळे लाखो लोकांचे आयुष्य बदलत आहे. काळानुसार रोजगाराचं स्वरुप बदलत आहे. आपल्याला AI मुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संकटावर लक्ष द्यावं लागेल. कोणतंही तंत्रज्ञान नोकऱ्या घेत नाही, हेच इतिहास आपल्याला सांगतो.  

Advertisement

( नक्की वाचा :  Cancer Diagnosis : वैद्यकीय क्षेत्रातून मोठी बातमी! कर्करोग कधी होऊ शकतो? कुठल्या स्टेजवर असेल? थुंकीतून होईल निदान! )

पंतप्रधान पुढे म्हणाले की, 'आपल्याला ओपन सोर्स सिस्टम विकसित करावी लागेल. ज्यामधून विश्वास आणि पारदर्शकता वाढेल. आम्हाला निष्पक्ष गुणवत्तापूर्ण डेटा सेंटर बनवलं पाहिजे. आम्हाला तंत्रज्ञानाचे लोकतंत्रीकरण करणे आवश्यक आहे. आपल्याला सायबर सुरक्षा, चुकीची माहिती तसंच डीपफेकच्या संबंधीत काळजी दूर केल्या पाहिजेत. तंत्रज्ञान स्थानिक प्रज्ञेमध्ये रुजलं पाहिजे. त्यामुळे ते प्रभावी आणि उपयुक्त ठरेल, असं पंतप्रधानांनी सांगितलं. 

भारत AI ची स्वीकार करण्याबरोबरच  डेटा गोपनीयतेचा तांत्रिक-कायदेशीर आधार तयार करण्यात आघाडीवर आहे, असं पंतप्रधान यांनी यावेळी स्पष्ट केलं.