Delhi New CM: दिल्लीत 'महिला राज'! रेखा गुप्ता होणार नव्या मुख्यमंत्री; गुरुवारी शपथविधी

रामलीला मैदानावर त्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल. या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Delhi New CM: आम आदमी पक्षाला धुळ चारत भारतीय जनता पक्षाने दिल्लीमध्ये तब्बल 27 वर्षानंतर सत्ता खेचून आणली. त्यानंतर आज दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचे नाव निश्चित करण्यात आले आहे. रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून यांच्या  नावाची अधिकृत घोषणा झाली . उद्या गुरुवारी (20 फेब्रुवारी) रामलीला मैदानावर त्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल. या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाचा दारुण करत भाजपने कमळ फुलवले. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 70 पैकी तब्बल 48 जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला तर सत्ताधारी आम आदमी पक्षाला केवळ 23 जागांवर समाधान मानावे लागले. धक्कादायक म्हणजे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचाही दारुण पराभव झाला.

भारतीय जनता पक्षाच्या विजयानंतर दिल्लीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत चर्चा सुरु होत्या. दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी  प्रवेश साहिबसिंह वर्मा, विजेंद्र गुप्ता, रवींद्र इंद्रराज सिंह, शिखा राय, राजकुमार भाटिया, जितेंद्र महाजन या सहा आमदारांची नावे चर्चेत होती. अखेर आता रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 

Chhatrapati Shivaji Maharaj : शूरवीर योद्ध्याला मुजरा! शिवजयंतीनिमित्त खास मेसेज पाठवून प्रियजनांना द्या शुभेच्छा)

दरम्यान, दिल्लीच्या रामलिला मैदानावर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजप आणि एनडीएची सत्ता असलेले 20 राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच उद्योगपती आणि क्रीडा, मनोरंजन विश्वातील अनेक मान्यवर उपस्थित राहतील.  

Advertisement

Topics mentioned in this article