जाहिरात

UAE Golden Visa : 23 लाखात गोल्डन व्हिजाचं सत्य उघड, UAE सरकारने केला मोठा खुलासा

UAE Golden Visa Fake News : गोल्डन व्हिजासाठी युएईच्या सरकारी वेबसाइट आणि अधिकृत चॅनलच्या माध्यमातून अप्लाय केलं जाऊ शकतं. बाहेरील किंवा खासगी सल्लागार या प्रक्रियेचे अधिकृत प्रतिनिधी मानले जाऊ शकत नाही. 

UAE Golden Visa : 23 लाखात गोल्डन व्हिजाचं सत्य उघड, UAE सरकारने केला मोठा खुलासा

UAE Golden Visa rumours : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल झाली होती. यानुसार, संयुक्त अरब अमिराती (UAE) काही खास देशांच्या नागरिकांना फक्त 23 लाखात म्हणजेच अंदाजे AED 1 लाखात लाइफटाइम गोल्डन व्हिसा (UAE Golden Visa) देणार आहे. भारत आणि बांग्लादेशसारख्या अनेक देशांमधील नागरिकांनी या बातमीबद्दल आनंद व्यक्त केला होता. मात्र आता यूएआ सरकारने या संपूर्ण प्रकरणात मोठा खुलासा केला आहे. 

UAE सरकारकडून दिला नकार...

UAE च्या Federal Authority for Identity, Citizenship, Customs and Port Security (ICP) ने स्पष्ट शब्दात याचं खंडन केलं आहे. गोल्डन व्हिजाशी संबंधित अफवा काही माध्यमांमधून समोर आल्या होत्या. मात्र यात कोणतंही सत्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. या संस्थेने सांगितलं की, लाइफटाइम गोल्डन व्हिजाचं वृत्त पूर्णपणे चुकीचं आहे आणि याला कोणताही कायदेशार आधार नाही. 

ICP ने सांगितलं की, गोल्डन व्हिजाशी संबंधित सर्व अटी, नियम आणि प्रक्रिया UAE च्या अधिकृत कायद्यांनुसार ठरविण्यात आली आहे. याबाबतची योग्य माहिती केवळ ICP चे संकेतस्थळ किंवा मोबाइल अॅपवर दिली जाते. 

Latest and Breaking News on NDTV



अप्लाय कसं करू शकता?



गोल्डन व्हिजासाठी युएईच्या सरकारी वेबसाइट आणि अधिकृत चॅनलच्या माध्यमातून अप्लाय केलं जाऊ शकतं. बाहेरील किंवा खासगी सल्लागार या प्रक्रियेचे अधिकृत प्रतिनिधी मानले जाऊ शकत नाही. 

परवानगीशिवाय चुकीच्या माहितीचा प्रचार...

यूएईच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, नुकतच एका परराष्ट्र सल्लागार फर्मने दावा केला होता की, परदेशातील कोणत्याही व्यक्तीला सोप्या अटींवर आजीवन गोल्डन व्हिसा मिळू शकतो, या बातमीला कोणताही कायदेशीर आधार नाही आणि ती यूएई सरकारच्या परवानगीशिवाय पसरवण्यात आली आहे. आता अशी खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com