Trending News: अरब शेखची रशियन बेगम! दुसरी पत्नी असून ही दुबईत जगते असं लाईफ की तुम्ही म्हणाल...

तिने दुबईतल्या एका अरब शेख बरोबर निकाह केला आहे. विशेष म्हणजे ती त्याची दुसरी पत्नी आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

life of second wife: भारतात दुसऱ्या लग्नाचा विषय आला की समाज भुवया उंचावतो. हिंदू विवाह कायदा (Hindu Marriage Act) याला बेकायदेशीर मानतो. पण जर आपण अरब देशांकडे नजर टाकली, तर तिथलं चित्र पूर्णपणे वेगळं दिसतं. दुबईमध्ये राहणाऱ्या एका रशियन बेगमने नुकतीच आपल्या आयुष्याची अशी झलक दाखवली आहे, जी आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जाते. जिथे लग्न, ऐश्वर्य आणि प्रेमाचे अर्थच बदलतात. तिने दुबईतल्या एका अरब शेख बरोबर निकाह केला आहे. विशेष म्हणजे ती त्याची दुसरी पत्नी आहे. 

शेखची दुनिया आणि दुसऱ्या बेगमची कहाणी
दुबईच्या एका श्रीमंत शेखची दुसरी पत्नी बनलेली ही रशियन महिला सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे. तिने 'emirati family' या नावाने इन्स्टाग्राम अकाउंट सुरू केलं आहे. त्यावर ती सगळ्यांना आपल्या रोजच्या जीवनाची माहिती देते. दुबईतल्या महिलांचे आयुष्य तसे पडद्याआड  असते. तिथे अरब महिला बुरखा घालतात. शिवाय त्या आपलं  खासगी आयुष्य दुसऱ्यां समोर प्रदर्शित करत नाहीत. त्या त्यांच्यामध्येच खूश असतात. पण इथे ही रशियन बेगम कसलीही भीती न बाळगता तिचा आलिशान व्हिला, चकचकीत दागिने, डिझायनर कपडे आणि महागड्या गाड्यांची दुनिया दाखवते. ते पाहून तुमचे डोळे विस्पारतील.

नक्की वाचा - Ladki Bahin Yojana: eKYC ला मुदत वाढ मिळणार? OTP चा घोळ वाढला, लाडक्या बहिणींचे टेन्शन ही वाढलं!

राजवाड्यासारखं आयुष्य आणि मुलांचं ऐश्वर्य
या बेगमला दोन गोंडस मुले आहेत. त्यांचं आयुष्य एखाद्या शाही कुटुंबापेक्षा कमी नाही. खासगी शाळा, त्यांच्यासाठी तयार केलेले स्पेशल प्ले एरिया, आलिशान ट्रिप्स आणि दुबईच्या सोनेरी स्कायलाइनच्या मध्ये त्यांचं रोजचं आयुष्य एखाद्या फिल्मी दृश्यासारखं आहे. हे एका चित्रपटाला शोभेल असचं सर्वांना वाटेल. पण हे त्या रशिय बेगमच्या खऱ्याखऱ्या आयुष्यात घडत आहे. शिवाय आपण दुसरी पत्नी असून ही आपली एवढी काळजी घेतली जाते. हवं ते सुख दिलं जातं हे ती आवर्जू सांगते. ती राहणं हे एखाद्या राणी पेक्षा कमी नाही. 

नक्की वाचा - Teeth Cavity: दातातील किडीचा 1 मिनिटात गेम ओव्हर! हे आहेत 4 प्रभावी घरगुती उपाय

पतीचं प्रेम आणि अरब नियम
या महिलेचं म्हणणं आहे की, तिचा पती म्हणजेच शेख तिची प्रत्येक लहान-मोठी इच्छा पूर्ण करतो.  मग ती युरोपची सहल असो, हिऱ्यांचा नेकलेस किंवा तिला आवडलेला गाऊन असो. तीने आदेश देताच ती वस्तू तिच्या समोर हजर असते. लोक तिला वारंवार विचारतात, ‘पहिल्या पत्नीसोबत तुझे संबंध कसे आहेत? तुला जेलस वाटत नाही का?' पण ती या प्रश्नांची उत्तरे न देता फक्त आनंदाचे क्षण शेअर करते. इस्लामिक कायद्यानुसार, शेखला आपल्या सर्व पत्नींना समान आदर, खर्च, घर आणि वेळ द्यावा लागतो. तो हे सर्व करू शकत असेल तरच त्याला चार लग्नांची परवानगी असते. 

Advertisement