'पुढची 5 वर्ष भयंकर, जग युद्धाच्या उंबरठ्यावर' परराष्ट्रमंत्र्यांची भविष्यवाणी! अमेरिकेलाही सुनावलं

S Jaishankar's 5-Year Prediction : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी जगातील बदलत्या परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर अमेरिकेलाही सुनावलं आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
S
नवी दिल्ली:

S Jaishankar's 5-Year Prediction : इस्रायल-इराणमधील तणाव तसंच रशिया आणि युक्रेनमधील युद्धासह जगाला सध्या वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागतोय. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी जगातील बदलत्या परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. आगामी पाच ते दहा वर्ष अत्यंत कठीण आहेत, असं भविष्य जयशंकर यांनी व्यक्त केलं. त्याचबरोबर अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारताची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला सुनावलं आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले जयशंकर?

जगात होणाऱ्या घटना लक्षात घेऊन तुम्ही भविष्याकडं कसं पाहाता? हा प्रश्न जयशंकर यांना मंगळवारी  (13 ऑगस्ट)  दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना जयशंकर यांनी सांगितलं की, 'मी आशावादी व्यक्ती आहे. मी सहसा प्रश्नांचं उत्तर शोधतो. पण तरीही मी हे खूप गांभीर्यानं सांगतो की आपण सध्या अत्यंत खडतर काळातून जात आहोत.'

जयशंकर पुढे म्हणाले की, 'आगामी 5 वर्षांसाठी माझा अत्यंत गंभीर अंदाज आहे. तुम्ही मध्य पूर्व, युक्रेन, दक्षिण पूर्व आणि पूर्व आशियामध्ये होत असलेल्या घटनांकडं पाहात आहात. त्याचबरोबर कोव्हिडचा प्रभाव अजूनही कायम आहे. आपण कोव्हिडच्या त्या भयंकर कालखंडातून बाहेर पडलो आहोत. पण, आता त्याला हलक्यात घेत आहोत. 

( नक्की वाचा : सेंट मार्टिन बेटाचं महत्त्व काय? जे अमेरिकेला देण्यास नकार दिल्यानं शेख हसीनांनी गमावली खुर्ची! )
 

तुम्ही जगातील आर्थिक आव्हानं पाहात आहात. त्याचा अनेक देश सामना करत आहेत. व्यापार अवघड होत आहे. त्याचबरोबर विदेशी चलन घटत चाललंय.  परराष्ट्रमंत्र्यांनी गाझामधील संघर्ष तसंच इराणचा पाठिंबा असलेल्या हुती दहशतवाद्यांकडून लाल समुद्रात व्यावसायिक जहाजांवर सातत्यानं पडत असलेल्या दरोड्यांवरही चिंता व्यक्त केली.

Advertisement

अमेरिकेला सुनावलं

जयशंकर यांना यावेळी अमेरिकेत यावर्षी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीवरही प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी अमेरिकेला सुनावण्याची संधी सोडली नाही. भारतामध्ये या प्रकारच्या निवडणुका दरवर्षी होतात. आपण त्याचं सातत्यानं आयोजन करतो. आपल्याकडं नुकत्याच निवडणुका झाल्या आहेत. आपण दुसऱ्यांच्या निवडणुकीवर कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. त्याचबरोबर दुसराही आमच्याशी असाच वागेल ही आपली अपेक्षा असते.' जयशंकर यांचा इशारा लोकसभा निवडणुकीच्या वेळी अमेरिकेनं दिलेल्या प्रतिक्रियेकडं होता. लोकसभा निवडणुकीच्या वेळी अमेरिकेनं धार्मिक मुद्यावर प्रतिक्रिया दिली होती. 

( नक्की वाचा : बांगलादेशमधील शेख हसीना सरकार अमेरिकेमुळे पडलं? ऑफर धुडकावण्याची मोजली किंमत! )
 

अमेरिकन नागरिक त्यांचा निर्णय घेतील. नव्या अध्यक्षांसोबत आम्ही काम करु शकतो. हा विश्वास गेल्या 20 वर्षांच्या अनुभवानंतर आम्हाला आहे, असं जयशंकर यांनी सांगितलं.  
 

Advertisement