Invisible Gold: समुद्रात 700 मीटर खाली सोन्याचा प्रचंड साठा; जगातील सर्वात मोठा खजिना सापडला?

वैज्ञानिकांनी ७०० मीटरच्या खोलीत फूल गोल्डच्या आत खरं सोनं सापडलं आहे. हे काही साधं सोनं नाही. ते दगडांमध्ये अणू पातळीवर दडलेले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

वैज्ञानिकांनी एक असा खजिना शोधला आहे जो डोळ्यांनी दिसत नाही. जपानची राजधानी टोकियोपासून ३६० किलोमीटर दूर समुद्रात हे मोठं यश मिळालं आहे. वैज्ञानिकांना ७०० मीटरच्या खोलीत फूल गोल्डच्या आत खरं सोनं सापडलं आहे. हे काही साधं सोनं नाही. ते दगडांमध्ये अणू पातळीवर दडलेले आहे. हिगाशी-आओगाशिमा काल्डेरा नावाच्या जागेवर हे संशोधन करण्यात आलं आहे. येथे समुद्राच्या तळाशी ज्वालामुखी आहेत. या ज्वालामुखींच्या जवळ दगडांमध्ये हे अदृश्य सोनं मिळालं आहे. या खडकांचे नमुने रोबोटिक पाणबुड्यांच्या साहाय्याने काढण्यात आले. या शोधाने भूगर्भशास्त्रज्ञांना चकित केलं आहे आणि यामुळे भविष्यात जगभरातील सोन्याच्या खाणकामाची पद्धत पूर्णपणे बदलू शकते.

फूल गोल्ड काय असतं? यातील सोन्याचा खजिना कसा मिळाला?

पायराइट हा एक प्रकारचा आयर्न सल्फाइड धातु आहे. याची चमक आणि पिवळा रंग अगदी सोन्यासारखा असतो. त्यामुळे याला फूल गोल्ड म्हटलं जातं. अनुभव नसलेले लोक अनेकदा याला खरं सोनं समजतात. मात्र यंदा या दगडाने वैज्ञानिकांना मोठं सरप्राइज दिलं आहे.

Advertisement

संशोधक रोबोटिक पाणबुड्यांच्या साहाय्याने समुद्राच्या तळापासून खडकांचे नमुने गोळा केले. यानंतर लॅबमध्ये या दगडात लहान लहान छिंद्र करीत त्यातून पाहण्यात आलं. यासाठी सेकंडरी-आयन मास स्पेक्ट्रोनेट्री तंत्रज्ञानाचा वापर झाला. या दगडांमधील सोन्याचे प्रमाण विक्रमी स्तरावर असून ते १.९ टक्के वजनापर्यंत पोहोचलं आहे, जे खूपच जास्त आहे, असे उघड झाले.

समुद्रात खोल असलेलं सोनं इतर खाणीपेक्षा वेगळं कसं आहे?

सर्वसाधारणपणे सोन्याच्या खाणीत सोनं दाणे किंवा तुकड्यांच्या स्वरुपात मिळतं. मात्र खोल समुद्रात मिळालेलं सोनं अत्यंत वेगळं आहे. हा धातू सीफ्लोर पाइराइटच्या क्रिस्टल लॅटिसच्या आत एक सॉलिड सॉल्यूशनच्या स्वरुपात आहे. सायन्टिफिक रिपोर्टमध्ये पब्लिश झालेल्या या रिसर्चने अनेक जुने समज मोडीत काढले आहेत.

हिगाशी-आओगाशिमा कॅल्डेरा हे एक पाण्याखालील ज्वालामुखी विवर आहे. त्याच्या तळाशी तीन सक्रिय जलऔष्णिक क्षेत्रे आहेत. सेंट्रल कोन, साउथईस्ट आणि ईस्ट साइट्स. या ठिकाणांवरून पृथ्वीच्या कवचाखालून खनिज-समृद्ध, अतिउष्ण द्रव सतत बाहेर पडतो. संपूर्ण परिसर काळ्या धुराड्यांनी आणि मोठ्या सल्फाइडच्या ढिगाऱ्यांनी व्यापलेला आहे.

ज्वालामुखीजवळ असलेल्या दगडांमध्ये सोन्याचं इतकं जास्त प्रमाण कसं आढळलं?

वैज्ञानिकांनी २०१५ मध्ये या भागात संशोधन सुरू केलं होतं. त्यावेळी दगडांमध्ये साधारण १०२ पार्ट प्रति मिलियन म्हणजे पीपीएम सोनं आढळलं होतं. हे प्रमाण जगभरातील अन्य डीप-सी डिपॉजिटच्या तुलनेत जास्त होतं. अन्य ठिकाणी हे प्रमाण ०.०१ हून ४३ पीपीएमपर्यंत असते.

Advertisement

या अभ्यासात, संशोधकांनी सर्व सक्रिय ठिकाणांवरून नमुने गोळा केले. हे नमुने त्यांच्या आकारानुसार चार गटांमध्ये विभागले गेले. काही दगडांची पूड करण्यात आली. त्यानंतर, मास स्पेक्ट्रोमीटरचा वापर करून त्यातील सोने आणि आर्सेनिकचे प्रमाण मोजण्यात आले. इलेक्ट्रॉन बीमद्वारे शिसे, तांबे आणि आर्सेनिक यांसारख्या धातूंच्या वितरणाचे मापन करण्यात आले. त्यानंतर, दगडांमधील सोन्याचा अणू पातळीवर शोध घेण्यासाठी अति-संवेदनशील तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.

क्रिस्टलच्या आत छोट्या स्तरावर सोन्याचं विशाल भांडार कसं लपवलं जातं?

सोनं दगडात कसं राहू शकतं, यावर वैज्ञानिक सर्वाधिक हैराण झाले आहेत. सोनं हे खनिजामध्ये अडकलेल्या लहान तुकड्यांच्या स्वरूपात नव्हतं. उलट, सोनं पायराइटच्या स्फटिक रचनेत अणू-अणूने विणलेले होते. जेव्हा आर्सेनिक, शिसे आणि तांबे यांसारखे घटक उपस्थित असतात, तेव्हाच हे शक्य असतं. हे घटक पायराइटच्या जाळीची रचना बदलतात, ज्यामुळे अशा जागा तयार होतात ज्यात सोन्याचे अणू स्फटिकांमध्ये बसू शकतात.दगडांमध्ये आर्सेनिकचे प्रमाण वाढल्याने, सोन्याची घनता देखील वाढली. आर्सेनिकने मूलतः गंधकाची जागा घेतली, ज्यामुळे मोठ्या सोन्याच्या आयनांसाठी जागा निर्माण झाली.

Advertisement