अंतराळवीर राकेश शर्मा यांच्यानंतर कित्येक वर्षांनी भारतीय वंशाचे शुभांशू शुक्ला अंतराळात झेपावले आहेत. अनेकदा रद्द झाल्यानंतर अखेर मिशन Axiom-4 अंतराळात झेपावलं आहे. हे मिशन अंतराळात झेपावत असताना अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळत होते. त्यांची आईच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. अखेर यशस्वीपणे मिशन Axiom-4 अंतराळात झेपावलं आहे.
Axiom-4 मिशन भारतासाठी गर्वाचा क्षण आहे. यामुळे देशाला अनेक फायदे मिळू शकतात. या मिशनमुळे भारताला अंतराळ संशोधनात आपली क्षमता वाढवण्याची आणि जागतिक स्तरावर आपली उपस्थिती निर्माण करण्याची संधी मिळेल. अॅक्सिओम-4 मोहीम केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाची नाही तर ती भारताची जागतिक प्रतिष्ठा, तांत्रिक क्षमता आणि आर्थिक शक्यतांना नवीन उंचीवर नेण्यासही तयार होईल. या मोहिमेत भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय आहे. 1984 नंतर पहिल्यांदा कोणी भारतीय अंतराळवीर या मिशनच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनचा भाग होणार आहे.
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये शुभांशू शुक्ला काय करतील?
Axiom Space मध्ये वेबसाइटनुसार, चारही अंतराळ प्रवासी आंतरराष्ट्रीय स्पेश स्टेशनवर 14 दिवसांपर्यंत 60 प्रयोग करतील. शुभांशु शक्ला अंतराळात सात प्रयोग करतील. ज्याचा उद्देश भारतात सूक्ष्म गुरुत्वाकर्षण संशोधनाला प्रोत्साहन देणे आहे. भारताचे 2035 पर्यंत स्वतःचे अंतराळ स्थानक बांधण्याचे आणि 2047 पर्यंत चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याचे उद्दिष्ट आहे. भारत त्यासाठी तयारी करत आहे.