Shubhashu Shukla Return: भारतीय अंतराळवीर आणि वायुसेनाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला अंतराळातून पृथ्वीवर लवकरच वापसी करणार आहेत. नासाने सांगितलं की, 14 जुलैच्या दुपारी 2.50 वाजता (भारतीय वेळेनुसार) त्यांच्या स्पेसक्राफ्टचा हॅच बंद केलं जाईल आणि सायंकाळी 4.35 वाजता आयएसएसपासून अनडॉकिंग होईल. तब्बल 22.5 तासांच्या प्रवासानंतर 15 जुलै रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ स्प्लॅशडाऊन होण्याची शक्यता आहे.
शुभांशू शुक्ला काय म्हणाला?
अंतराळवीर शुभांशू शुक्लाने रविवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर 16 दिवसांच्या प्रवासाची सांगता करताना म्हणाला, अंतराळातून भारत महत्त्वकांक्षा, निर्भिड, आत्मविश्वास आणि अभिमानाने भरलेला दिसतो. शुक्लाने भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा याच्या 1984 मध्ये वापरलेल्या शब्दांचा पुनर्रुच्चार केला. आजही भारत अंतराळातून 'सारे जहां से अच्छा' असा दिसतो, असं शुभांशू म्हणाला. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर एक्सिओम-4 मिशनच्या अंतराळवीरांसाठी आयोजित केलेल्या सांगता समारोहादरम्यान त्याने अशी टिप्पणी केली.
शुक्लाने आयएसएसने आपल्या प्रवासाचा उल्लेख करताना म्हणाले, मला ते जादूसारखे वाटते... माझ्यासाठी हा एक अद्भुत प्रवास होता. शुक्ला २६ जून रोजी आयएसएसमध्ये पोहोचले होते. भारतीय अंतराळवीर शुक्ला म्हणाले, मी स्वत:सोबत अनेक स्वप्न आणि शिकवण घेऊन जात आहे. हे मी पृथ्वीवर पोहोचल्यानंतर मी भारतीयांसोबत हे शेअर करेन. आयएसएसवर 18 दिवसांच्या वैज्ञानिक प्रयोगांनंतर, शुभांशू शुक्ला आणि 'अॅक्सिओम-4' मोहिमेतील इतर तीन अंतराळवीरांना निरोप देण्याची वेळ आली आहे आणि ते सोमवारी पृथ्वीवर परतीचा प्रवास सुरू करतील.
नक्की वाचा - UNESCO: छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा! महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत!