BLA Attack: बलूच लिबरेशन आर्मीचा पाकिस्तानातील शहरावरच कब्जा, सरकारी कार्यालये ताब्यात

बलुच लिबरेशन आर्मीने (BLA) एक निवेदन जारी करत म्हटले की, बँका, लेव्ही स्टेशन आणि पोलीस स्टेशनसह प्रमुख सरकारी प्रतिष्ठानांवर कब्जा करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या एका शहरावर दावा केल्याचा दावा केला आहे. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या बलुच लिबरेशन आर्मीच्या प्रवक्त्यांनी हा दावा केला आहे. बलुचिस्तानच्या कलाट विभागात असलेले सुरब शहर त्यांनी ताब्यात घेतल्याचा दावा बलुचिस्तान आर्मीने केला आहे.

बलुच लिबरेशन आर्मीने (BLA) एक निवेदन जारी करत म्हटले की, बँका, लेव्ही स्टेशन आणि पोलीस स्टेशनसह प्रमुख सरकारी प्रतिष्ठानांवर कब्जा करण्यात आला आहे. मुख्य क्वेट्टा-कराची आणि सुरब-घिदर महामार्गांवरही जलद तपासणी आणि गस्त सुरू आहे. 

स्थानिक सूत्रांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शेकडो बलूच आर्मीच्या सशस्त्र जवानांनी सुरबवर हल्ला केला आणि पोलीस ठाणी, बँका आणि अनेक सरकारी कार्यालये ताब्यात घेतली. त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची शस्त्रे हिसकावून घेतली. यासोबतच, सशस्त्र बलुच जवानांनी अनेक अधिकाऱ्यांना आपल्या ताब्यात घेतल्याचा दावाही करण्यात आला.

पाकिस्तानी सूत्रांनी सांगितले की, अनेक शस्त्रधारी शहरात घुसली होती. तीन सरकारी अधिकाऱ्यांच्या घरांवर त्यांनी गोळीबार केला आणि त्यांचे अपहरण झाले असावे. एका बँकेचा ताबा घेण्यात आला आहे. काही दुकाने जाळण्यात आली आहेत. परंतु संपूर्ण सुरब शहरावर त्यांचे नियंत्रण नाही. 

Advertisement

मागील काही कालावधीत घडत असलेल्या या घटनांवरून असे दिसत आहे की  पाकिस्तानने बलुचिस्तानवरील आपले नियंत्रण पूर्णपणे गमावले आहे. याआधी बीएलएच्या 33 बंडखोरांनी ट्रेनचा ताबा घेतला होता. बीएलएच्या बंडखोरांकडून पाकिस्तानच्या जवानांवर सातत्याने हल्ले देखील चढवले जात आहेत.