दक्षिण कोरियात आणीबाणी लागू, राष्ट्राध्यक्षांची घोषणा; राजकीय तणाव वाढला

Martial Law in south Korea : दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक योल यांनी मंगळवारी देशात विरोधी पक्षांवर ठपका ठेवत देशात मार्शल लॉची घोषणा केली.

जाहिरात
Read Time: 1 min
नवी दिल्ली:

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक योल यांनी मंगळवारी देशात विरोधी पक्षांवर ठपका ठेवत देशात मार्शल लॉची घोषणा केली. त्यांनी टेलिव्हिजनवर याची घोषणा केली. या घोषणेनंतर दक्षिण कोरियातील राजकीय तणाव वाढला आहे. उत्तरेकडील कम्युनिस्ट शक्तींपासून दक्षिण कोरियाचं रक्षण करण्यासाठी यून यांनी आणीबाणी जाहीर करीत असल्याचं सांगितलं. 

नक्की वाचा - परीक्षेत नापास झाला म्हणून कॉलेज कॅम्पसमध्ये हल्ला, 10 जणांचा मृत्यू 17 जखमी

राष्ट्रपती यून सुक योल यावेळी म्हणाले, दक्षिण कोरियाला उत्तर कोरियाच्या कम्युनिस्ट शक्तींकडून होणाऱ्या धोक्यापासून वाचविण्यासाठी आणि देशविरोधी तत्वांचा समूळ नाश करण्यासाठी मी आपात्कालीन मार्शल लॉची घोषणा करतो. देशाचं स्वातंत्र्य आणि संविधानिक व्यवस्थेच्या संरक्षणासाठी हे आवश्यक असल्याचं सांगितलं. वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, दक्षिण कोरियातील विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते ली जे-म्युंग यांनी मार्शल लॉची घोषणा असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे. सत्ताधारी पीपल्स पॉवर पार्टीचे प्रमुख हान डोंग-हुन यांनीही मार्शल लॉ चुकीचा असल्याचे म्हटले आहे.