- प्रभाकर प्रसाद हे बिहारमधील गरीब कुटुंबातील असून अमेरिकेत चहा व्यवसाय उभारणारे उद्योजक आहेत
- त्यांच्या लहानपणी कुटुंबाने बिहार सोडून भोपाळमध्ये स्थलांतर केले होते
- मुंबईत मॉडेलिंगमध्ये संघर्ष केला, नंतर अमेरिकेत MBA पूर्ण करून विविध कॉर्पोरेट नोकऱ्या केल्या
IITian chai business in US: प्रभाकर प्रसाद यांची यशोगाथा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अत्यंत गरिबीत बालपण गेलेल्या प्रभाकर यांने आज अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. एकेकाळी थंडीपासून वाचण्यासाठी गोणपाटाचा आधार घेणाऱ्या या तरुणाने आज सातासमुद्रापार भारतीय चहाचा सुगंध दरवळवला आहे. चहाचा उद्योग त्याने असा काही वाढवला आहे की तो पाहून आपण थक्को होवून जावू. प्रभाकर हा बिहारमधील बाढ (Barh) या छोट्या गावातला आहे. विशेष म्हणजे तो IITian आहे. त्याला IITian चहावाला म्हणून अमेरिकेत ओळखलं जातं.
प्रभाकर यांचे कुटुंब बिहारमध्ये असताना त्यांच्या भावाच्या अपहरणाचा प्रयत्न झाला होता. ज्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या कुटुंबाने रातोरात बिहार सोडून भोपाळ गाठले. हिंदी माध्यमातून शिकलेल्या प्रभाकर याला सुरुवातीला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत भाषेच्या अडचणींमुळे थट्टेचा विषय व्हावे लागले होते. मात्र, जिद्दीच्या जोरावर त्याने अभ्यासात प्रगती केली. शिवाय IIT ची स्क्रीनिंग परीक्षा उत्तीर्ण होऊन स्वतःचे सामर्थ्य सिद्ध केले. आयआयटी झाल्याने चांगली नोकरी मिळणार हे त्याला माहित होते.
IIT मधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर 2008 मध्ये प्रभाकर याला पहिली नोकरी मिळाली. मात्र, त्याला कॉर्पोरेटमधील बंदिस्त आयुष्य फार काळ रुचले नाही. त्याला कोडिंगपेक्षा जिम आणि शरीरसौष्ठवामध्ये (Bodybuilding) अधिक रस होता. याच आवडीपायी त्यांनी मुंबई गाठली आणि मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावण्यास सुरुवात केली. परंतु, मुंबईतील संघर्षही सोपा नव्हता. छोट्या खोल्यांमधील वास्तव्य, ऑडिशन्सच्या लांबलचक रांगा आणि कामाची अनिश्चितता यामुळे त्यांना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. अशा स्थितीत प्रभाकर अस्वस्थ झाला होता.
नक्की वाचा - Iran Vs Israel-US War: इराण-अमेरिका यु्द्ध थांबणार? आखातातील आग विझणार, हे आहेत 5 संकेत
प्रभाकर यांची प्रेयसी अमेरिकेत राहत असल्याने त्यांनी तिथे जाण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला दोन वेळा त्यांचा व्हिसा नाकारला गेला. पण तिसऱ्या प्रयत्नात 2014 मध्ये तो टेक्सासमध्ये पोहोचला. तिथे त्यांनी MBA पूर्ण केले. त्यानंतर काही वर्षे विविध शहरांमध्ये कॉर्पोरेट नोकऱ्या केल्या. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. अमेरिकेतील आयुष्य सुखाचे वाटत असतानाच त्यांच्या आयुष्यात वादळ आले. नोकरी जाणे, वैयक्तिक नात्यातील दुरावा आणि आरोग्याच्या समस्या अशा एकापाठोपाठ एक संकटांनी त्यांना घेरले. मात्र, या सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी आपला चहाचा व्यवसाय सुरू केला.
नोकरी गेल्यानंतर खचून न जाता प्रभाकर यांनी चहाचा व्यवसाय सुरू केला. आज ते अमेरिकेत साधारण $8 म्हणजेच भारतीय चलनानुसार 780 रुपयांना एक कप चहा विकत आहेत. त्यांच्या या 'बिहारी चहा'ला परदेशात मोठी मागणी असून, एका व्हायरल व्हिडिओमुळे त्यांच्या या थक्क करणाऱ्या प्रवासाची दखल संपूर्ण जगाने घेतली आहे. जानेवारी महिन्यात प्रभाकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि ते प्रकाशझोतात आले. लॉस एंजेलिसच्या रस्त्यावर ते चहाचा स्टॉल लावतात. विशेष म्हणजे त्यांच्या एका कप चहाची किंमत 780 रुपये ($8) इतकी आहे. संघर्षातून मिळालेले हे यश सध्या हजारो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.