जाहिरात

Pune News: पुण्यातील प्रसिद्ध बादशाही हॉटेल बंद, कधी होणार सुरू? का घेतला निर्णय? व्हायरल फोटोमुळे चिंता वाढली

Pune News: पुण्यातील प्रसिद्ध बादशाही हॉटेल गॅस टंचाईमुळे बंद करण्यात आले आहे. जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठा विस्कळीत झाला असून त्याचा फटका पुणेकर खवय्यांना बसला आहे. वाचा सविस्तर बातमी.

Pune News: पुण्यातील प्रसिद्ध बादशाही हॉटेल बंद, कधी होणार सुरू? का घेतला निर्णय? व्हायरल फोटोमुळे चिंता वाढली
"Pune News: पुण्यातील प्रसिद्ध बादशाही हॉटेल बंद, धक्कादायक कारण समोर"
NDTV Marathi

- अजिंक्य धायगुडे-पाटील, प्रतिनिधी

Pune News: आखाती देशांमध्ये युद्धाचा भडका उडल्याने त्याच्या झळा आता महाराष्ट्रालाही बसत आहेत. युद्धजन्य परिस्थितीचा फटका पुणेकरांनाही सहन करावा लागत आहे. जगभरात निर्माण झालेल्या इंधन आणि गॅस टंचाईचा मोठा फटका पुणे शहरातील हॉटेल व्यावसायिकांना बसू लागला आहे. याच टंचाईमुळे पुण्यातील टिळक रोडवर असलेले प्रसिद्ध आणि जुने 'बादशाही' हॉटेल दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.

हॉटेलबाहेर लावला 'तो' फलक | Pune News | Pune Badshahi Hotel 

गेल्या अनेक दशकांपासून पुणेकरांना उत्कृष्ट चवीच्या खाद्यपदार्थांची मेजवानी देणारे 'बादशाही' हॉटेल बंद असल्याचे पाहून ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. हॉटेलच्या प्रवेशद्वारावर व्यवस्थापनाने एक फलक (बोर्ड) लावला आहे. त्यावर स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की,"गॅस टंचाईमुळे उपहारगृह 12 मार्च आणि 13 मार्च रोजी बंद राहील. शनिवारी (14 मार्च) उपहारगृह सुरू होईल." हा फलक सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, पुणेकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

(नक्की वाचा: Heatwave Alert: सावधान! पुणे मुंबईसह राज्याचा पारा 40 पार; उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये?)

युद्धजन्य परिस्थिती आणि पुरवठा साखळीवर परिणाम

जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे नैसर्गिक वायू (Natural Gas) आणि एलपीजीच्या पुरवठा साखळीवर प्रचंड ताण आला आहे. केवळ पुणेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गॅसची टंचाई जाणवू लागली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे आणि वेळेवर पुरवठा होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ग्राहक संख्या असलेल्या हॉटेल्सना स्वयंपाकघर चालवणे अशक्य झाले आहे.

(नक्की वाचा: Pune News: नवले पूल की मृत्यूचा सापळा? पुण्यात कार-ट्रकचा भीषण अपघात, 3 जण रक्ताच्या थारोळ्यात)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठे संकट

बादशाहीसारख्या नामांकित हॉटेलवर ही वेळ आल्यामुळे इतर छोट्या-मोठ्या हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत. जर गॅसची ही टंचाई अशीच सुरू राहिली तर पुण्यातील इतर अनेक प्रसिद्ध खाद्यगृहे देखील बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हॉटेल असोसिएशनने या प्रकरणी शासनाने हस्तक्षेप करून व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. पुणेकर (Pune News) खवय्यांसाठी ही बातमी अत्यंत निराशाजनक असून 'बादशाही' हॉटेल पुन्हा सुरू होण्यासाठी आणखी दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com