सुचीर बालाजी या 26 वर्षीय तरुणाचा अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को मृत्यू झाला आहे. घरात संशयास्पद अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला आहे. यापूर्वी OpenAI येथे रिसर्च इंजिनिअर म्हणून काम केले होते. त्यावेळी त्याने कंपनीच्या कार्यप्रणाली आणि त्याच्या कार्यपद्धतीवर सार्वजनिकपणे प्रश्न उपस्थित केले होते.
सुचीरच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार नोव्हेंबर 2020 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत त्याने OpenAI साठी काम केले. दोन महिन्यांपूर्वी, न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सुचीर बालाजीने ओपनएआयवर कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.
24 ऑक्टोबर रोजी X अकाऊंटवरील सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले होते की, “मला सुरुवातीला कॉपीराइट, फेअर यूज इत्यादींबद्दल फारशी माहिती नव्हती. पण GenAI कंपन्यांविरुद्ध दाखल झालेले सर्व खटले पाहून उत्सुकता वाढली. जेव्हा मी ही समस्या अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मी शेवटी या निष्कर्षावर पोहोचलो की बऱ्याच जनरेटिव्ह एआय उत्पादनांसाठी योग्य वापर हा एक अतिशय अकल्पनीय संरक्षणासारखा वाटतो. कारण ते प्रशिक्षित डेटाशी स्पर्धा करणारे पर्याय तयार करू शकतात."
कोण होता सुचीर बालाजी?
ओपनएआयमध्ये काम करण्यापूर्वी सुचीर बालाजीने कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथे कॉम्पुटर सायन्सचा अभ्यास केला. कॉलेजमध्ये असताना त्याने ओपनएआय आणि स्केल एआयमध्ये इंटर्नशिप केली.
लिंक्डइननुसार, सुचीरने सुरुवातीच्या दिवसांमध्ये ओपनएआय, WebGPT वर काम केले आणि नंतर GPT-4 साठी प्रीट्रेनिंग टीम, o1 बरोबर रिझनिंग टीम आणि ChatGPT साठी पोस्ट-ट्रेनिंग केले.
चार वर्षे कंपनीत काम केल्यानंतर सुचीरने ओपनएआय सोडले. त्यानंतर त्याने न्यूयॉर्क टाईम्सला सांगितले की, त्याला जेवढे समजले त्यामध्ये हे तंत्रज्ञान समाजासाठी चांगल्यापेक्षा अधिक हानी पोहोचवेल. OpenAI कथित कॉपीराइट डेटा कसा वापरतो ही त्याची मुख्य चिंता होती.
मित्रांच्या संपर्कात नव्हता
रिपोर्ट्सनुसार, बालाजीने गेल्या काही दिवसांपासून त्याच्या मित्र आणि सहकाऱ्यांचे फोन कॉल उचलले नाही आणि घराबाहेरही आला नव्हता. त्याचे मित्र त्याच्या फ्लॅटमध्ये पोहोचले तेव्हा दरवाजा आतून बंद होता. त्यानंतर त्यांनी सॅन फ्रान्सिस्को पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडून आत जाऊन पाहिले असता बालाजीचा मृतदेह आढळून आला. सॅन फ्रान्सिस्को पोलीस विभागाने सांगितले की, प्राथमिक तपासात कोणताही पुरावा आढळला नाही आणि सध्या हे प्रकरण आत्महत्या असल्याचा संशय आहे. याप्रकरणी अधिक माहिती देण्यास पोलिसांनी सध्या नकार दिला आहे.
| Helplines | |
|---|---|
| Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555help@vandrevalafoundation.com022-25521111
Topics mentioned in this article
|