टेलिग्रामचे संस्थापक आणि सीईओ पावेल डुरोव (Pavel Durov, founder and CEO of Telegram) यांची मोठी चर्चा होत आहे. कारण आहे त्यांच्या अटकेचं. टेलिग्रामवरील मजकुरावर कमी नियंत्रण असणे, या माध्यमातून चालणारी गुन्हेगारी कृत्य या प्रकरणात त्यांना फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.
मात्र त्यांच्याबाबतच्या आणखी एका गोष्टीमुळे त्यांच्याबाबत चर्चा केली जात आहे. टेलिग्रामचे संस्थापक आणि सीईओ पावेल डुरोव यांनी नुकतच आपल्या टेलिग्रामवर एक पोस्ट शेअर करीत सर्वांना धक्का दिला आहे. पावेलने आपल्या पोस्टमध्ये सांगितलं की, लग्न न करता त्याचे 12 देशांमध्ये 100 मुलं आहेत.
मित्राच्या मुलाचे बाबाही झाले...
पावेल यांनी सांगितलं की, 15 वर्षांपूर्वी त्यांच्या मित्राला मूल होण्यात अडचणी येत होत्या. यावेळी स्वत: मित्रानेच पावेल यांना स्पर्म डोनेट करण्याची विनंती केली. स्पर्म डोनेट करीत असताना क्लिनिकमध्ये गेल्यावर त्यांना डॉक्टरांनी सांगितलं की, तुमचं स्पर्म चांगल्या क्वालिटीचं आहे. यामुळे तुमच्या मित्राला मदत होईल.
हे ही वाचा - Male Y Chromosome : आता खरंच मुलांचा जन्म होणार नाही? रीसर्चमधील धक्कादायक माहिती
स्पर्म डोनरच्या माध्यमातून 100 मुलांचे बाबा...
पावेल हे स्पर्म डोनर होते. यातूनच त्यांची 100 बायोलॉजिकल मुलं आहेत. 15 वर्षांपूर्वी त्यांनी मित्राला मूल होत नसल्याने स्पर्म डोनेट केलं होतं. त्यामुळे सद्यस्थितीत त्यांचा पहिला मुलगा आता 14 वर्षांचा असेल. पावेल यांनी सांगितलं की, बारा देशांमध्ये त्यांची 100 हून अधिक मूलं आहेत. टेलिग्रामवर एक मोठी पोस्ट शेअर करीत त्यांनी आपण बायोलॉजिकल बाबा असल्याचं सांगितलं. ते पुढंही असंही म्हणाले की, डीएनए सार्वजनिकपणे उपलब्ध करायला हवं. यातून जे पालक आई-वडील होऊ शकत नाहीत त्यांना मदत होईल.
रशिया का सोडला?
पावेल दुरोवचा यांचा जन्म रशियामध्ये झाला होता. पण ते बालपणीच इटलीत स्थायिक झाले होते. दुरोव यांचे वडील फिलॉलॉजिकल सायन्सेसचे डॉक्टर आहेत. 39 वर्षीय दुरोव यांनी रशियातील सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात शिक्षण घेतलं. रशियातील अधिकाऱ्यांनी त्यांना अॅप वापरकर्त्यांच्या डेटाबद्दल विचारणा केल्यानंतर त्यांनी तो देश सोडल्याची माहिती आहे. पॉवेल यांच्याकडे फ्रान्स, रशिया, सेंट किट्स आणि नेव्हिस आणि यूएईचंही नागरिकत्व आहे.
संपत्ती जवळपास 15.5 बिलियन डॉलर
पावेल दुरोव एक अरबपती आहेत. त्यांची संपत्ती जवळपास 15.5 बिलियन डॉलर आहे. त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत सोशल नेटवर्किंग आणि सेज प्लेटफॉर्ममधील त्यांची गुंतवणूक आहे.