जाहिरात
This Article is From Aug 18, 2024

भूताचं शहर! 'या' शहरात 62 वर्षापासून लागलीय आग,चक्रावून टाकणाऱ्या घटना

संपुर्ण शहरात गॅस आणि धुराचं साम्राज्य आहे. या परिस्थितीमुळे अनेक लोकांना आपली घरं सोडावी लागली आहेत.

भूताचं शहर! 'या' शहरात 62 वर्षापासून लागलीय आग,चक्रावून टाकणाऱ्या घटना

असं एक शहर आहे ज्या शहराला 62 वर्षापूर्वी आग लागली होती. ती आग आज ही विझलेली नाही. या शहराची ओळख भूतीया शहर म्हणूनच आता झाली आहे. हे शहर अमेरिकेतील पेनिसिल्वेयातील सेंट्रलिया हे शहर आहे. 1962 साली या शहराला आग लागली आणि शहराचं संपुर्ण चित्रच बदलून गेलं. विशेष म्हणजे ही आग का लागली हे अजूनही स्पष्ट होवू शकलेलं नाही. ती आग आजही या शहरात आहे. हे शहर खाणींसाठी प्रसिद्ध होतं. या खाणींमध्ये केले जाणारे स्फोट यात या आगीचे कारण लपलं असल्याचेही बोललं जात आहे. संपुर्ण शहरात गॅस आणि धुराचं साम्राज्य आहे. या परिस्थितीमुळे अनेक लोकांना आपली घरं सोडावी लागली आहेत. 

आग लागण्या आधी हे शहर समृद्ध होतं. कोळश्याचे माहेरघर म्हणून या शहराची ओळख होती. कोळसा खाणीच्या माध्यमातून या शहराची भरभराट झाली होती. त्यातून स्थानिकांना मोठा रोजगार मिळाला होता. सेंट्रलियामध्य कुख्यात मौली मैगुइरेस याचंही घर होतं. त्याने इथे खाण कामगारांचे संघटन उभे केले होते. शहरात सर्व काही सुरळीत होतं. लोक खूश होते. पैसा हाता खेळत होतो. 1962 नंतर मात्र या शहराचा चेहरामोहरा बदलून गेला. शहराला आग लागली. ही आग विझवण्यासाठी सात मिलियन डॉलर खर्च करण्यात आले. पण आग काही विझली नाही. शेवटी 1990 मध्ये हे काम थांबवलं गेलं. पण जर ही आग तशीच सोडली तर ती अनेक वर्ष तशीच जळत राहील असे पर्यावरण विभागाने सांगितले आहे. 
 

असं असलं तरी हे शहर तीन दशकापासून पर्यटकांचे आकर्षण होत आहे. इथं पर्यटक आता मोठ्या संख्येने येत आहेत. यात पर्यटकांना जर कोणी आकर्षित करत असेल तर तो "ग्रैफ़िटी हाईवे" आहे. हा हाईवे सर्वांना आपल्याकडे आकर्षीत करतो. याचे अनेक फोटोही सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. मात्र हे शहर ओळखले जाते ते इथल्या आगीमुळे. न विझणाऱ्या आगी मुळे. ही आग सर्वांसाठीच एक रहस्य बनली आहे.    

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: