तिबेटमध्ये आज 7 जानेवारी रोजी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे तिबेटचं मोठं नुकसान झालं आहे. न्यूज एजन्सी एएफपीने चीनचे वृत्त माध्यम शिन्हुआच्या हवाल्याने ही माहिती दिली. त्यानुसार आज नेपाळच्या सीमेजवळील तिबेटमध्ये 7.1 रिश्टल स्केलचा भूकंप झाला. या घटनेत 32 जणांचा मृत्यू झाला आणि 38 लोक जखमी झाले आहेत. आज सकाळी झालेले भूकंपाचे झटके भारताही पाहायला मिळाले. बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालसह देशातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले.
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचं केंद्र 28.5 डिग्री उत्तर अक्षांश आणि 87.45 डिग्री पूर्वेकडील देशांवर होता. चीन भूकंर वेटवर्क केंद्राकडून जारी केलेल्या रिपोर्टमध्ये भूकंप 10 किलोमीटर खोलीवर झाला. नेपाळमध्ये 2015 मध्ये 7.8 तीव्रतेचा भूकंप आला होता. ज्यात तब्बल 9हजार लोकांचा मृत्यू झाला होता आणि 22 हजारहून जास्त लोक जखमी झाले होते. यात पाच लाखांहून अधिक जणांना नुकसान सहन करावं लागलं होतं.
नक्की वाचा - Pakistan Air Strike : पाकिस्तानचा अफगाणिस्तावर एअर स्ट्राईक, 15 जणांचा मृत्यू
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार, सकाळी 6.35 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. एनसीएसच्या माहितीनुसार, भूकंपानंतर लगेचच या प्रदेशात आणखी दोन भूकंप झाले.