दिग्गज गोल्फ खेळाडू टायगर वुड्स आणि डोनाल्ड ट्रम्प ज्युनियरची पहिली पत्नी व्हेनेसा ट्रम्प यांच्यात बऱ्याच काळापासून कथित अफेअरच्या चर्चा सुरु होती. या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. कारण टायगर वुड्सने अधिकृतपणे दोघांच्या नात्याची पुष्टी केली आहे.
टायगर वुड्सने 24 मार्च रोजी इंस्टाग्राम अकाउंटवर दोन रोमँटिक फोटो शेअर केले आणि त्यांच्या नात्याची घोषणा केली. पोस्टसोबत त्याने लिहिले की, "तुझ्यासोबत आयुष्य आणखी सुंदर वाटते! आम्हाला आमच्या आयुष्यातील या नवीन प्रवासाला सुरुवात करण्याची उत्सुकता आहे. याशिवाय टायगर वुड्सने फॅन्सकडे प्रायव्हसी राखण्याची मागणी देखील केली आहे.
डेली मेलने 14 मार्च रोजी दावा केला होता की, वुड्स आणि व्हेनेसा आधीपासून एकमेकांना डेट करत होते. व्हेनेसा अनेकदा वुड्सच्या फ्लोरिडा येथील घरी जाते आणि तिथे राहते. अहवालानुसार, दोघांनी सुरुवातीला त्यांचे नाते खाजगी ठेवण्याचा निर्णय घेतला होता आणि सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसणे टाळले होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असलेल्या चांगल्या संबंधांमुळे टायगर वुड्सने नातं उघड करण्यात टाळाटाळ केली होती.
नवीन नात्यामुळे ट्रम्पसोबतच्या त्याच्या नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती टायगर वुड्सला होता. मैत्रीपासून दोघांच्या नात्याला सुरुवात झाली होती. पण हळूहळू त्यांच्यात जवळीक वाढली आणि त्यांनी त्यांचे नाते पुढे नेण्याचा निर्णय घेतला. अहवालांनुसार, व्हेनेसाचे विभक्त पती डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांना या नात्यात कोणतीही अडचण नाही. दोघेही 2018 मध्ये दोघे वेगळे झाले. दोघांना पाच मुले आहेत.
कोण आहे व्हेनेसा?
58 वर्षीय व्हेनेसा के. पेर्गोलिझी मॅनहॅटनच्या अप्पर ईस्ट साईडवर लहानाची मोठी झाली . तिची आई, बोनी के हेडन 'के मॉडेल्स' नावाची मॉडेलिंग एजन्सी चालवायची. तिचे सावत्र वडील चार्ल्स हेडन हे वकील होते. व्हेनेसाने मॅनहॅटनमधील द ड्वाइट स्कूल या खाजगी शाळेत शिक्षण घेतले. तिने मेरीमाउंट कॉलेजमध्ये मानसशास्त्राचा अभ्यास केला आहे. डोनाल्ड ट्रम्प ज्युनियरशी लग्न करण्यापूर्वी व्हेनेसाचे डेटिंग आयुष्य खूपच मनोरंजक होते. तीचं अनेकांची नाव जोडलं गेलं होतं.
टायगर वुड्सचे वैवाहिक आयुष्य
टायगर वुड्सने एलिन नॉर्डेग्रेनशी पहिलं लग्न केले होते, मात्र 2010 साली दोघांचा घटस्फोट घेतला. त्यानंतर त्याचे ऑलिंपिक स्कीअर लिंडसे वॉन आणि नंतर एरिका हरमन यांच्याशी संबंध होते. 2022 मध्ये त्याचे एरिकासोबत ब्रेकअप झाले, जे खूपच वादग्रस्त ठरले.