- अमेरिकन सरकारने यूएस टेक फोर्स अंतर्गत 1000 तंत्रज्ञांना भरती प्रक्रिया सुरु केली आहे
- निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक 1 कोटी ते 1.6 कोटी रुपयांपर्यंत पगार मिळेल
- Amazon, Nvidia, OpenAI आणि Uber यांसारख्या 28 दिग्गज कंपन्या या भरती कार्यक्रमात सहभागी आहेत
तुम्ही आयटी क्षेत्रात करिअर करू इच्छिता? तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. अमेरिकन सरकारने 'यूएस टेक फोर्स' नावाने मोठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. तब्बल 1000 टेक एक्सपर्ट्सना सरकार थेट आपल्या ताफ्यात सामील करून घेणार आहे. या नोकरीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे भरमसाट पगार आहे. येथे तुम्हाला वार्षिक 1 कोटी ते 1.6 कोटी रुपयांपर्यंतचे पॅकेज मिळू शकते.
दिग्गज कंपन्यांकडून मिळणार ट्रेनिंग केवळ सरकारी नोकरीच नाही, तर तुम्हाला जगातील सर्वोत्तम कंपन्यांकडून शिकण्याची संधी मिळेल. Amazon, Nvidia, OpenAI आणि Uber यांसारख्या 28 दिग्गज कंपन्या या कार्यक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत. हे तज्ज्ञ तुम्हाला मेंटरशिप आणि ट्रेनिंग देतील. या नोकऱ्या पूर्णपणे अ-राजकीय (Non-political) असतील. ज्यामुळे तंत्रज्ञांना कोणत्याही दबावाशिवाय काम करता येईल.
या नोकरीसाठी कोणत्याही विशिष्ट जुन्या अनुभवाची अट नसून तरुण इंजिनिअर्सना प्राधान्य दिले जाणार आहे. 'USA Jobs' पोर्टलवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. जर तुमची निवड झाली, तर तुम्हाला थेट अमेरिकन सरकारच्या हाय-टेक प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी मिळेल. नवीन वर्षात विदेशात करिअर करू पाहणाऱ्या तरुणांसाठी ही 'लॉटरी'च मानली जात आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या भारतीय तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. त्यामुळे ही संधी दवडू नका.
तंत्रज्ञान क्षेत्रातील युवकांसाठी अमेरिकन सरकारने नोकरीची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. आपल्या सरकारी यंत्रणेला अधिक हाय-टेक बनवण्यासाठी अमेरिका 1000 सॉफ्टवेअर इंजिनिअर्सची फौज तयार करत आहे. या 'यूएस टेक फोर्स' मधील कर्मचाऱ्यांना वार्षिक 1,30,000 डॉलर ते 1,95,000 डॉलर इतके वेतन दिले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना दोन वर्षांच्या कार्यक्रमांतर्गत फेडरल एजन्सीमध्ये नियुक्त केले जाईल. त्यांचे मुख्य काम आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, सायबर सुरक्षा (Cyber Security), क्लाउड कॉम्प्युटिंग आणि डेटा ॲनालिटिक्समध्ये असेल.
नक्की वाचा - चहा सोबत काय खावू नये? 'हे' पदार्थ खाणे टाळा नाही तर अनेक समस्यांचे व्हाल शिकार