अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन सोडून उर्वरित जगासाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. चीन सोडून जगावरील आयात कराला 90 दिवसांची स्थगिती देण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. भारतावरही लावण्यात आलेल्या आयात कराला ट्रम्प यांनी स्थगिती दिली आहे. भारताला मोठा दिलासा देणाऱ्या ट्रम्प यांनी चीनबाबतचे कठोर धोरण कायम ठेवले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चीनी मालावर 125 टक्के कर लावण्याचा निर्णय ट्रम्प यांनी केला आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी चीनवर 104 टक्के कर लावला होता. आता त्यावर आणखी 21 टक्के कर वाढवला आहे. जगातली 75 देशांनी अमेरिकेशी संपर्क साधला होता. त्या देशांना दिलासा देण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला आहे. त्यामुळे आगामी 90 दिवस या देशांवर कोणताही आयात कर अमेरिका लादणार नाही.
व्हाइट हाऊसने मंगळवारी चीनवर 104 टक्के टॅरिफ लावला होता. या मोठ्या टॅरिफमुळे केवळ चीनच्या अर्थव्यवस्थेलाच झटका बसेल असं नाही तर दोन्ही देशांमध्ये एक नवं व्यापार युद्ध उद्भवण्याची शक्यता आहे. चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी स्पष्ट केलं की,चीनजवळ पुरेसे धोरण पर्याय असून बाहेरील कोणताही आर्थिक झटका पूर्णपणे कुचकामी करू शकतो.ली कियांग यांनी ट्रम्प यांच्या टॅरिफ अटॅकच्या निर्णयाला एकतर्फी असल्याचं म्हटलं. तर यावर प्रत्युत्तर देण्याच्या तयारीचा जोर वाढला आहे.