जाहिरात

Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून चीनवर 104% टॅरिफ, आज रात्रीपासून होणार लागू

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कडक टॅरिफ नियमांमुळे जागतिक व्यापार युद्ध उफाळण्याची भीती आहे.

Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून चीनवर 104% टॅरिफ, आज रात्रीपासून होणार लागू

सध्या जग एक मोठ्या आर्थिक संकटाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कडक टॅरिफ नियमांमुळे जागतिक व्यापार युद्ध उफाळण्याची भीती आहे. व्हाइट हाऊसने मंगळवारी चीनवर 104 टक्के टॅरिफ लावला. आता चीन यावर काय प्रतिक्रिया देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या मोठ्या टॅरिफमुळे केवळ चीनच्या अर्थव्यवस्थेलाच झटका बसेल असं नाही तर दोन्ही देशांमध्ये एक नवं व्यापार युद्ध उद्भवण्याची शक्यता आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

डोनाल्ड ट्रम्पकडून झटका मिळाल्यानंतर आता चीनची भारताकडून अपेक्षा आहे. भारतातील चीनच्या एम्बसीचे प्रवक्ता यू जिंग म्हणाले, चीन आणि भारत दोन्ही विकसनशील देश आहेत आणि अशात अमेरिकेने टॅरिफसारखे पाऊल उचलल्याने दक्षिणेकडून देशाच्या विकासाचा अधिकार हिरावण्याचा प्रयत्न आहे. ते म्हणाले की, भारत आणि चीनने एकत्र येत या आव्हानांचा सामना करायला हवा. जगभरातील शेअर बाजारात सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. तेलाच्या किमती $60 प्रतिबॅरेलपर्यंत कोसळली आहेत. 

Hajj 2025 : सौदी अरेबियानं भारतासह 14 देशांच्या नागरिकांच्या व्हिसावर बंदी का घातली?

नक्की वाचा - Hajj 2025 : सौदी अरेबियानं भारतासह 14 देशांच्या नागरिकांच्या व्हिसावर बंदी का घातली?

चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी स्पष्ट केलं की, चीनजवळ पुरेसे धोरण पर्याय असून बाहेरील कोणताही आर्थिक झटका पूर्णपणे कुचकामी करू शकतो. ली कियांग यांनी ट्रम्प यांच्या टॅरिफ अटॅकच्या निर्णयाला एकतर्फी असल्याचं म्हटलं. तर यावर प्रत्युत्तर देण्याच्या तयारीचा जोर वाढला आहे. 

अमेरिकेनं चीनवर लावलेल्या 104 टक्के आयातशुल्कानंतर याचा परिणाम आशियाई बाजारावरही दिसतोय. जपानचा शेअर बाजार 3 टक्क्यांनी घसरलाय. जगभरात आर्थिक अस्थिरता निर्माण होत आहे. भारत आणि चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त कर लावला आहे.  त्यात आता अमेरिकेकडून चीनवर आणखी मोठा टॅरिफ बॉम्ब टाकण्यात आला आहे. ज्यामधून जागतिक बाजारपेठेमध्ये व्यापार युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे