India Russia Trade : संकटात साथ देतो तोच खरा मित्र असं म्हणतात.. रशिया आणि भारत यांच्या मैत्रीच्या बाबतीत ही म्हण अगदी तंतोतंत खरा ठरतो. रशियाकडून कच्चं तेल खरेदी केल्यामुळे भारतावर अमेरिकनं 50 टक्के टॅरिफ लावला. रशियानं भारताकडून मिळालेल्या पैशातून युक्रेनशी युद्ध सुरु ठेवल्याचा दावा यावेळी अमेरिकनं केला. भारत अमेरिका संबंधात विशेषतः व्यापारी संबंधात टेरिफमुळे मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
भारताच्या आर्थिक विकासावरही जवळपास अर्ध्या टक्क्याची घट येण्याची शक्यता आहे. अशावेळी रशियानं भारताला एक खास ऑफर दिलीय. या ऑफरमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला बसणारी झळ कमी होण्यास मदत होणार आहे. काय आहे ती ऑफर ? आणि त्यामुळे अमेरिकेच्या दंडेलशाहीला चाप लागणार आहे.
काय आहे रशियाची ऑफर?
रशियाचे भारतामधील राजदूत रोमन बाबूश्कीन यांनी आज (20 ऑगस्ट) दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यांनी यावेळी थेट हिंदीमधून संवाद साधला. ते फक्त हिंदीमध्ये बोलून थांबले नाहीत. त्यांनी यावेळी एक मोठी घोषणा केली. बाबूश्कीन यांनी सांगितलं की, 'भारतीय माल अमेरिकेत विकण्यावर काही अडचणी येत असतील, तर त्याच मालासाठी रशियाची बाजारपेठ खुली आहे.'
( नक्की वाचा : Home Loan : तुमचा EMI कमी होणार, 'या' बँकांनी कमी केले व्याज दर, इथे करा चेक )
बाबूश्कीन इकडे भारतावर ऑफर्सची बरसात करत असताना पराराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सहअध्यक्षतेखाली आज मॉस्कोमध्ये भारत-रशिया 26 साव्या इंटर गव्हर्नमेंटल परिषदेला सुरुवात झाली. आणि इकडे रशियाने भारताला एक जोरदार ऑफर दिली.
रशियाकडून भारताला मिळणाऱ्या कच्च्या तेलाच्या किंमत बाजार भावापेक्षा पाच टक्के कमी किंमतीला देण्यात येणार आहे. भारत रशियाकडून त्याच्या गरजेच्या साधारण 38 टक्के कच्चे तेल आयात करतो. सध्या कच्च्या तेलाचे भाव गेल्या पाच वर्षातल्या नीचांकी पातळीवर आहेत. तरी रशियाच्या या ऑफरमुळे भारताचा प्रति बॅरल साधारण 3 ते 4 डॉलर प्रतिबॅरलचा फायदा होणार आहे.
' मी चुकत नसेल, तर भारत वर्षाला साधारण 240 दशलक्ष टन कच्चं तेल त्यांच्या रिफायनरींसाठी रशियाकडून विकत घेतो. त्यामुळे याचा अर्थ रशिया जवळपास 40 टक्के कच्चं तेल भारताला पुरवतो.. सवलतीचं म्हणाल तर तो कंपन्यांमधील व्यापारी सिक्रेटचा भाग आहे. तरी सुद्धा जर आपण सरासरी विचार केला, तर ही सवलत 5 टक्क्याच्या आसपास असते.' असं रशियन दुतावासातील व्यापार प्रतिनिधी इ.व्ही. ग्राव्हिया यांनी स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा 'मुड स्विंग', भारतावरील टॅरिफबाबत केली मोठी घोषणा )
भारताचे किती पैसे वाचणार?
भारत आपल्या एकूण गरजेपैकी 80 टक्क्यांपेक्षा जास्त कच्चं तेल आयात करतो. विद्यमान परिस्थितीत त्यापैकी सर्वाधिक तेल रशियातून होतं. विशेष म्हणजे 2022 पर्यंत एकूण आयातीपैकी फक्त 0.2 टक्के कच्च तेल रशियातून येत असे. पण युद्ध सुरु झालं, आणि परिस्थिती बदलली. सध्याच्या परिस्थितीत भारत रशियाकडून रोज 17 लाख 80 हजार बॅरल खरेदी करतो
इराककडून दररोज 9 लाख बॅरल कच्चं तेल आयात करतो. तर सौदी अरेबियाकडून 7 लाख तर अमेरिकेकडून 2 लाख 71 हजार बॅऱलची आयात होते.
आता दररोज साधारण 18 लाख बॅरल कच्च्या तेलावर प्रत्येकी 3 ते 4 डॉलर वाचणार असतील तर भारताचे दररोज 3 कोटी 20 लाख डॉलर्स वाचणार आहे. जर वर्षभराचा विचार केला तर साधारण 1 अब्ज डॉलर्सची आणि पर्यायानं 8800 कोटी रुपयांची बचत होणार आहे.
पंधरा ऑगस्टला पुतीन आणि ट्रम्प यांची बैठक झाली. सोमवारी ट्रम्प, झेलेन्स्की आणि युरोपियन युनियनच्या प्रतिनिधींची बैठक झाली. तरीही रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धावर तोडगा निघेलही. पण भारत-रशिया यांच्यातील तेल व्यापाराचा मुद्दा अजूनही अमेरिकेच्या डोक्यात पक्का बसलाय. याच मुद्द्यावरुन भारतावर 50 टक्के टेरिफ लावल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या वारंवार सांगत असतात.
आंतरराष्ट्रीय राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो असं म्हणतात..पण भारत-रशिया यांची मैत्री मात्र ही उक्ती खोटी ठरवणारी आहे. योगायोग म्हणा..किंवा आणखी काही...सुवर्णजयंती साजरा करणाऱ्या 'शोले'ची कहाणी जय आणि वीरच्या गहिऱ्या मैत्रीची आहे. भारत-रशियाची 78 वर्षांची मैत्रीही जय वीरु सारखीच घट्ट आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार आहे.