US Iran War: तेहरानवर अण्वस्त्रांचे सावट? ट्रम्प यांचा 'विनाशकारी' इशारा आणि 4 मोठे संकेत

Iran Nuclear Strike Possibility: जगाच्या नकाशावरून इराणचे अस्तित्व कायमचे पुसले जाणार का असा थरकाप उडवणारा प्रश्न आता समोर उभा ठाकला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

तन्मय टिल्लू, प्रतिनिधी

Iran Nuclear Strike Possibility: जगाच्या नकाशावरून इराणचे अस्तित्व कायमचे पुसले जाणार का असा थरकाप उडवणारा प्रश्न आता समोर उभा ठाकला आहे. अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता अशा वळणावर आला आहे जिथे केवळ युद्ध नाही तर महाविनाशाची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या ताज्या इशाऱ्याने संपूर्ण जगात खळबळ उडालीय. इराणला एका तासात नष्ट करण्याची धमकी त्यांनी दिली आहे. ही केवळ धमकी आहे की की एखाद्या मोठ्या हल्ल्याची ही पूर्वतयारी आहे याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

ट्रम्प यांच्या धमकीचा नेमका अर्थ काय?

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या विधानात अत्यंत गंभीर संकेत दिले आहेत. त्यांच्या मते इराणने आता आपली नौदल शक्ती गमावली असून त्यांच्याकडे प्रभावी विमानविरोधी यंत्रणा किंवा रडार उरलेले नाही. इराणचे अनेक प्रमुख नेते मारले गेले आहेत आणि आता अमेरिका अशा एका शस्त्राचा वापर करण्याच्या विचारात आहे जे इराणला एका तासात उद्ध्वस्त करू शकेल. 

Advertisement

ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर तेहरानमध्ये भीतीचे वातावरण असून जर असा हल्ला झाला तर इराणला आपला देश पुन्हा उभा करण्यासाठी किमान 25 वर्षांचा काळ लागेल असा दावा केला जात आहे.

( नक्की वाचा : Iran US War: इराणमध्ये नवा 'बॉस'! मोजताबा खामेनींच्या पहिल्याच भाषणाने जगात खळबळ; अमेरिकेला दिली मोठी धमकी )

विनाशाचे चार मोठे संकेत

सध्याची परिस्थिती पाहता चार महत्त्वाचे संकेत या युद्धाच्या भीषणतेची साक्ष देत आहेत. पहिला संकेत स्वतः ट्रम्प यांनी दिलेले खळबळजनक विधान आहे. दुसरा संकेत म्हणजे इराणच्या अणुस्थळांना लक्ष्य करण्याची वाढलेली शक्यता. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अत्यंत खोलवर मारा करणाऱ्या बंकर बस्टर बॉम्बचा संभाव्य वापर आणि चौथा सर्वात चिंताजनक संकेत म्हणजे रेडिएशनपासून संरक्षण देणाऱ्या औषधांची अचानक वाढलेली मागणी. हे सर्व मुद्दे एकत्र पाहिल्यास अमेरिका मोठ्या कारवाईच्या तयारीत असल्याचे दिसून येते.

 अण्वस्त्र हल्ल्याची धास्ती

अण्वस्त्र युद्धाची चर्चा केवळ कागदावर राहिलेली नाही तर त्याचे पडसाद आता जमिनीवर उमटू लागले आहेत. अमेरिका आणि इराणमधील या संघर्षात अणुहल्ल्याचा धोका ओळखून आखाती देशांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. बहरीन, कतार, कुवेत आणि जॉर्डन यांसारख्या देशांनी रेडिएशनपासून संरक्षण देणाऱ्या पोटॅशियम आयोडाइड टॅब्लेटची मागणी नोंदवली आहे. ब

बहरीनमधील एका औषध कंपनीने भारताशी संपर्क साधून सुमारे 125 दशलक्ष टॅब्लेटच्या उपलब्धतेबाबत चौकशी केली आहे. ही औषधे अणुस्फोटानंतर होणाऱ्या किरणोत्सर्गापासून मानवी शरीराचे संरक्षण करण्यासाठी वापरली जातात.

Advertisement

( नक्की वाचा : Iran US War : इराण युद्धात पाकिस्तानची एन्ट्री? होर्मुझमध्ये पाकिस्तानी नौदल तैनात, वाचा Inside Story )
 

इतिहासाची पुनरावृत्ती होणार?

जगाच्या इतिहासात अण्वस्त्रांचा वापर फक्त एकदाच झाला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात 1945 मध्ये अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकून युद्ध संपवले होते. त्या एका निर्णयाने मानवी इतिहास बदलला आणि लाखो लोकांचा बळी घेतला. आज इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष पुन्हा त्याच धोकादायक वळणावर येऊन थांबला आहे.

इराणला नमवण्यासाठी अमेरिका पुन्हा एकदा त्याच मार्गाचा अवलंब करणार का आणि यातून निर्माण होणारा राखेचा ढग संपूर्ण जगाला कवेत घेणार का या प्रश्नाने सध्या मानवतेसमोर मोठे संकट उभे केले आहे.
 

Advertisement