जाहिरात

Iran US War : इराण युद्धात पाकिस्तानची एन्ट्री? होर्मुझमध्ये पाकिस्तानी नौदल तैनात, वाचा Inside Story

Iran US War : अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगाची गणिते बदलत असताना पाकिस्तान एका मोठ्या पेचात अडकला आहे.

Iran US War : इराण युद्धात पाकिस्तानची एन्ट्री? होर्मुझमध्ये पाकिस्तानी नौदल तैनात, वाचा Inside Story
Iran US War : पाकिस्तानने या मोहिमेला 'ऑपरेशन मुहाफिज-उल-बह्र' असे नाव दिले आहे.
मुंबई:

Iran US War : अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगाची गणिते बदलत असताना पाकिस्तान एका मोठ्या पेचात अडकला आहे. स्वतःला मुस्लिम जगाचा मोठा भाऊ समजणारा पाकिस्तान सध्या एका बाजूला आपला 'मुस्लिम बंधू' देश इराण आणि दुसरीकडे ज्यांच्यासमोर मदतीसाठी पदर पसरावा लागतो तो 'शक्तिशाली' अमेरिका, अशा कात्रीत सापडला आहे. पाकिस्तानच्या सध्याच्या हालचाली पाहता, हा देश इराणविरुद्धच्या युद्धात थेट उतरणार का, अशी चर्चा आता जागतिक स्तरावर रंगू लागली आहे.

पाकिस्तानची आर्थिक स्थिती सध्या अत्यंत नाजूक आहे. एका बाजूला देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना दुसरीकडे लष्करी आणि राजनैतिक पातळीवर पाकिस्तान मोठी खेळी खेळताना दिसत आहे. या युद्धाच्या निमित्ताने पाकिस्तानचे राजकारण सध्या कोणत्या दिशेला जात आहे, याचे अनेक पुरावे समोर येत आहेत.


पाकिस्तानी नौदलाचा वावर आणि संशयाची सुई

पश्चिम आशियातील युद्धाला आता एक वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे नौदल अचानक सक्रिय झाले असून त्यांनी आपल्या तेलवाहू जहाजांना संरक्षण देण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे ही जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ आहेत. पाकिस्तानला इराणकडून धोका वाटत आहे की अमेरिकेच्या सांगण्यावरून पाकिस्तानने ही पावले उचलली आहेत, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

पाकिस्तानने या मोहिमेला 'ऑपरेशन मुहाफिज-उल-बह्र' असे नाव दिले आहे. पाकिस्तानचे 90% तेल आणि एलएनजी याच मार्गावरून येते. त्यामुळे या मार्गाचे संरक्षण करणे हे प्राथमिक लक्ष्य असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. 

मात्र, राजकीय तज्ज्ञांच्या मते, हे केवळ जहाजांचे संरक्षण नसून इराणविरुद्धच्या युद्धात सामील होण्याचे पहिले पाऊल असू शकते. अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेव्हा त्यांच्या नौदलाद्वारे सुरक्षा देण्याची घोषणा केली, त्यानंतर लगेचच पाकिस्तानने आपले नौदल तैनात करणे हे बरेच काही सांगून जाते.

(नक्की वाचा : Iran Israel War : फक्त 2 तासांची नोटीस अन् युद्धाच्या मैदानात भारतीय लेकीची एन्ट्री; वाचा थरकाप उडवणारी गोष्ट )

सौदीला आश्वासन आणि ट्रम्पपुढे लाचारी

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर सध्या सौदी अरेबियाला आश्वस्त करत आहेत की आम्ही तुमच्या संरक्षणासाठी सदैव सोबत आहोत. दुसरीकडे, पंतप्रधान शाहबाज शरीफ हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयांचे स्वागत करताना दिसतात. मात्र, इराणच्या बाबतीत पाकिस्तान दुटप्पी भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. एकीकडे इराणला पाठिंबा असल्याचा देखावा करायचा आणि दुसरीकडे अमेरिकेच्या युद्धनीतीचा भाग व्हायचे, असे दुहेरी राजकारण सध्या सुरू आहे.

इराणने इस्रायल आणि अमेरिकन तळांवर हल्ले करण्यासोबतच होर्मुझची सामुद्रधुनी रोखण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामुळे जागतिक तेल संकट निर्माण झाले आहे. अशा वेळी पाकिस्तानने घेतलेली भूमिका या युद्धाची व्याप्ती वाढवू शकते.

( नक्की वाचा : Iran US War: इराणमध्ये नवा 'बॉस'! मोजताबा खामेनींच्या पहिल्याच भाषणाने जगात खळबळ; अमेरिकेला दिली मोठी धमकी )

ट्रम्प यांची नाराजी 

पाकिस्तान इतके प्रयत्न करत असूनही अमेरिका मात्र त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवताना दिसत नाही. ज्या मुनीर यांचे ट्रम्प कौतुक करायचे, त्याच पाकिस्तानवर आता ट्रम्प प्रशासन नाराज असल्याचे वृत्त आहे. अमेरिकेने नुकतीच पाकिस्तानच्या 4 कंपन्यांवर बंदी घातली आहे. यामध्ये पाकिस्तानच्या नॅशनल डेव्हलपमेंट कॉम्प्लेक्स या सरकारी संस्थेचाही समावेश आहे.

लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसित करणे आणि मोठ्या प्रमाणावर विनाश घडवणाऱ्या शस्त्रांना पाठिंबा देणे, असा ठपका ठेवत अमेरिकेने ही कारवाई केली आहे. यामुळे पाकिस्तानची स्थिती 'इकडे आड आणि तिकडे विहीर' अशी झाली आहे. इराणशी पंगा घेतला तर मुस्लिम देशांचा रोष ओढवेल आणि अमेरिकेला साथ दिली नाही तर आर्थिक रसद थांबेल, अशा विचित्र कोंडीत पाकिस्तान अडकला आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com