- रूस के कामचटका प्रायद्वीप में आठ दशमलव आठ तीव्रता का भूकंप आया, जिससे सुनामी लहरें उत्पन्न हुईं.
- सुनामी का असर जापान के होक्काइडो द्वीप और रूस के कुरील द्वीप समूह पर प्रमुख रूप से देखा गया.
- जापानी कलाकार रियो तात्सुकी ने 1999 में एक मंगा में 2025 में जापान में बड़े संकट की भविष्यवाणी की थी.
२५ दिवसांनंतर बाबा वेंगाची भविष्यवाणी ठरली खरी,
रशियाच्या कॅमचटका द्वीपकल्पाजवळ 8.8 तीव्रतेचा एक अत्यंत शक्तिशाली भूकंप झाला. भारतीय वेळेनुसार 30 जुलै सकाळी 4:54 वाजता आलेल्या या भूकंपाने त्सुनामीच्या लाटा उसळल्या. ज्याचा परिणाम द्वीप होक्कइडोच्या उत्तरेकडे आणि रशियाच्या कुरील द्वीप समूहावर झाला आहे. या भयावह घटनेनंतर आता जापानी कलाकार रियो तात्सुकी म्हणजेच बाबा वेंगाची भविष्यवाणीची आठवण येत आहे. ही भविष्यवाणी १९९९ साली करण्यात आली होती.
25 दिवसांनंतर आली त्सुनामी...
तात्सुकीच्या मंगा द फ्यूचर आय सॉ या पुस्तकानुसार, 5 जुलै 2025 रोजी दक्षिण जपानमध्ये एका मोठ्या संकटाची भविष्यवाणी केली होती. ही त्सुनामी भविष्यवाणी केल्याच्या 25 दिवसांनंतर आली आहे. म्हणजेच बाबा वेंगाने पाच जुलै त्सुनामीची शक्यता वर्तवली होती. मात्र त्याच्या 25 दिवसांनंतर ही भविष्यवाणी खरी ठरली. मात्र तात्सुकीने जी भविष्यवाणी केली ती संपूर्ण महिनाभरासाठी होती का असा प्रश्न लोकांना पडला आहे.
1999 मध्ये करण्यात आली होती भविष्यवाणी...
सोशल मीडियावर या त्सुनामीचा संबंध तात्सुकीच्या भाकिताशी जोडला जात आहे. ही घटना जरी ५ जुलैला किंवा त्याच्या जवळपास घडली नसली तरीही बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा सन्मान केला जात आहे. बाबा वेंगाची भविष्यवाणी यापूर्वीच सत्यात उतरल्याचं सांगितलं जात आहे. 1999 मध्ये बाबा वेंगाने आपल्या भविष्यातील स्वप्नांच्या आधारावर 'एक मंगा, द फ्यूचर आय सॉ' पब्लिश केलं होतं.
डायनाच्या मृत्यूची भविष्यवाणी खरी ठरली...
बाबा वेंगाने 1991 मध्ये फ्रेडी मर्करीचा मृत्यू, 1995 मध्ये कोबेमधील भयंकर भूकंप आणि 2011 मध्ये जपानमधील त्सुनामीची भविष्यवाणी केली होती. हे सर्व त्यांना स्वप्नात दिसलं होतं. या सर्व घटनांचं बाबा वेंगाने भाकित वर्तवलं होतं. बाबा वेंगाने जुलै 2025 मध्ये एका महात्सुनामीचा इशारा दिला होता. त्यांनी स्वप्नात जपानच्या दक्षिणेकडून समुद्राला 'उकळताना' पाहिलं, याचा अर्थ समुद्राखाली ज्वालामुखी विस्फोटाचा इशारा होता.