Crime: दोन भारतीयांनी चोरला सिंगापूरचा खास हिरा, मनी हाईस्टपेक्षाही भन्नाट आयडिया केली, किंमत वाचून सर्वच थक्क

सिंगापूरमध्ये दोन भारतीय पर्यटकांनीही असंच कृत्य केलं आहे. त्यांनी तोंडात एक हिरा लपवून मोठी चोरी केली,जे पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Diamond Robbery In Singapore

Daimond Robbery In Singapore :  कधी कधी खऱ्या चोरीच्या घटना फिल्मी कहाण्यांनाही मागे सोडतात.सिंगापूरमध्ये दोन भारतीय पर्यटकांनीही असंच कृत्य केलं आहे. त्यांनी तोंडात एक हिरा लपवून मोठी चोरी केली,जे पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे. या चोरट्यांची आयडिया फार वेळ टिकू शकली नाही,आता त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण? 

ही घटना 19 जूनला घडली. 41 वर्षांच्या मनोजकुमार कुर्जीभाई आणि 30 वर्षांचे त्याचे सहकारी मिलन रामनिकभाई सिंगापूरच्या प्रसिद्ध चायनाटाऊन परिसरात एका ज्वेलरी शॉपमध्ये पोहोचले.त्यांचं लक्ष तिथे ठेवलेल्या एका खास 4.95 कॅरेटच्या हिऱ्यावर पडली. या हिऱ्याची किंमत जवळपास 154000 डॉलर (जवळपास 1.48 कोटी रुपये) होती.

Advertisement

नक्की वाचा >> Badlapur News : बदलापूर, वांगणी परिसराला वादळी वाऱ्याचा फटका! दोन दिवसांपासून बत्ती गुल, काही शाळांना सुट्टी

या दोघांनी चोरीची जी पद्धत अवलंबली,ती खूप चालाखीने केलेली होती. मनोजकुमारने दुकानाच्या मॅनेजरला बोलण्यात दंग केलं. याच दरम्यान,मिलनने चालाखीने खऱ्या हिऱ्याला त्या नकली हिऱ्यात बदललं.जो त्याने आधीच त्याच्या तोंडात लपवला होता.अदला-बदली केल्यानंतर मिलनने कोट्यावधींचा तो खरा हिरा त्याच्या तोंडात लपवला.त्यानंतर दोघांनी काहीही खरेदी न करता,गुपचूप दुकानातून बाहेर पडले. 

सीसीटीव्ही झाला व्हायरल

चोरांना वाटलं की, त्यांचा प्लॅन यशस्वी झाला आहे आणि कोणी त्यांना पकडू शकत नाही. दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेराने त्यांच्या हालचाली रेकॉर्ड केल्या होत्या. पोलीस तातडीनं एक्शन मोडमध्ये आले आणि त्याच दिवशी दोघांना विमानतळावरून अटक करण्यात आली.जेव्हा त्यांनी देशातून पळून जाण्याच्या प्रयत्नात होते,तेव्हा त्यांची झाडाझडती केली आणि खरा हिरा त्यांच्या बॅगमध्ये सापडला.

नक्की वाचा >> Ahilyanagar News: सावधान! अहिल्यानगरच्या 'या' ठिकाणी पिसळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, एकाचा मृत्यू, 15 जण जखमी

कोर्टाने काय शिक्षा सुनावली?

कोर्टात गुन्हा कबूल केल्यानंतर मनोजकुमारला दोन वर्ष,दोन महिने आणि दोन आठवड्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसच त्याच्यासोबत मिलन अजूनही पोलीस रिमांडमध्ये आहे आणि लवकरच त्याच्या शिक्षेबाबत निर्णय जाहीर केला जाईल. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे,दोन्ही चोरांनी भारतातूनच खोटा हिरा आणला होता. हा हिरा दिसायला, वजन आणि सीरिएल नंबरमध्येही खऱ्या हिऱ्यासारखा होता. आता पोलीस याचा शोध घेत आहेत की,सिंगापूरच्या या खास हिऱ्याची एवढी इत्यंभूत माहिती त्यांना भारतात कशी मिळाली..