Badlapur Rain Today : सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाने बदलापूर आणि वांगणी परिसराला झोडपलं आहे.काल बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे बदलापुरात तीन ते चार वाहनांवर झाड कोसळून वाहनांचं नुकसान झालं आहे. तर वांगणी परिसरात अनेक घरांचे तसंच इमारतींवरील छतांचे पत्रे उडाले आहेत.सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र गेल्या दोन दिवसांपासून वांगणी भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
चार ते पाच ठिकाणी झाडे उन्मळून पडली
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर,वांगणी तसेच आसपासच्या परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. या फटका शेतकऱ्यांसह परिसरातील नागरिकांना आणि वाहन चालकांना बसला आहे. बदलापुरात काल बुधवारी रात्रीच्या वेळेस चार ते पाच ठिकाणी झाडे उन्मळून पडली. यामुळे जवळपास तीन ते चार वाहनांचं नुकसान झालं आहे.खबरदारीचा उपाय म्हणून काही शाळांनी आज सुट्टी जाहीर केलीय.दरम्यान, वांगणी परिसरातील वीजपुरवठा गेल्या दोन दिवसांपासून खंडित असल्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत.
नक्की वाचा >> Students Video : 'या' भागातील शाळकरी मुलांच्या जीवाला धोका, पूराच्या पाण्यात जाऊन शेतकऱ्याने जे केलं..
नगराध्यक्ष रुचिता घोरपडे काय म्हणाल्या?
या संदर्भात बदलापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी प्रतिक्रिया की, प्रशासन सज्ज आहे. गेल्या 24 तासापासून आपत्कालीन यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. झाडे कोसळल्याची घटना घडली आहे. बदलापूर गावात दोन गाड्यांचे नुकसान झाले आहे कोणतीही जीवितहानी झाली नाही. आमच्या हद्दीतील नगर परिषदेच्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. महावितरण अधिकारी देखील नगर परिषदेच्या प्रशासनासोबत काम करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world