UAE Rain : निसर्गाशी छेडछाड करणं महागात पडलं? वाळवंटात पूर येण्याचं कारण काय?

देशात गेल्या 75 वर्षात पहिल्यांदा सर्वात जास्त पाऊस झाल्याचं सांगण्यात आलं आहे. अशा वेळी प्रश्न उद्भवतो तो वाळवंटी भागात अचानक इतका पाऊस कोसळण्याचं कारण काय?

जाहिरात
Read Time: 2 mins
दुबई:

संयुक्त अरब अमिरात आणि त्याच्या आजूबाजूच्या वाळवंटी भागात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे भयावह स्थिती निर्माण झाली आहे. जगातील सर्वात स्मार्ट शहरांमध्ये नावाजलं जाणाऱ्या दुबईमध्ये सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. परिस्थिती इतकी बिघडली की, दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करावं लागलं. शहरांमध्ये हायवेवर गाड्या ठिकठिकाणी अडकून पडल्या आहेत. शॉपिंग मॉलपासून ते मेट्रो स्टेशनमध्ये पाणी शिरलंय. गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आणि मंगळवारी सायंकाळपर्यंत इतका पाऊस झाला जो साधारण दीड वर्षांत होतो. यूएईपूर्वी ओमानच्या अधिकाऱ्यांनी पुराचा इशारा दिला होता. देशात गेल्या 75 वर्षात पहिल्यांदा सर्वात जास्त पाऊस झाल्याचं सांगण्यात आलं आहे. अशा वेळी प्रश्न उद्भवतो तो वाळवंटी भागात अचानक इतका पाऊस कोसळण्याचं कारण काय?

क्लाऊड सीडिंग जबाबदार?
UAE ची सरकारी एजन्सी WAM ने ही ऐतिहासिक घटना असल्याचं सांगितलं. 1949 नंतर पाहिल्यांदा इतका मोठा पाऊस झाल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजेच या भागात तेलाचा शोध घेण्यापूर्वी या भागात मुसळधार पाऊस पडला असावा, अशी  शक्यता आहे. निसर्गाशी छेडछाड करणं यामागे कारण असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, दुबई आणि संयुक्त अरब अमिरातच्या दुसऱ्या भागात नुकताच झालेला पाऊस आणि त्यानंतर आलेला पूर...या दोन्ही घटना क्लाऊड सीडिंगशी जोडलेल्या आहेत. 

Advertisement

हे ही वाचा-दुबईत पावसाचा हाहाकार, वर्षभराचा पाऊस एकाच दिवशी; 18 जणांचा मृत्यू

संयुक्त अरब आमिरात पृथ्वीवरील सर्वात उष्ण आणि शुष्क भागांपैकी एक आहे. पावसासाठी क्लाऊड सीडिंग या प्रणालीचा वापर करण्यात हा देश सर्वात पुढे आहे. या प्रद्धतीचा मुख्य उद्देश वाढती लोकसंख्या आणि अर्थव्यवस्थेची पाण्याची मागणी पूर्ण करणं हा आहे. युएईने 2002 मध्ये क्लाऊड सीडिंग ऑपरेशन सुरू केलं होतं. जेव्हा ढग अतिरिक्त पाऊस निर्माण करतात, अशा  विशिष्ट काळात ढगांच्या संरचनेवर लक्ष केंद्रीत केलं जातं. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, हवामानशास्त्रज्ञ अहमद हबीब यांच्या हवाल्याने सांगितलं की, नुकतेच सीडिंग करण्यासाठी विमानांना अल-एन विमानतळावरून पाठवण्यात आलं होतं. 

Advertisement

क्लाऊड सीडिंग म्हणजे काय?
कृत्रिम पावसासामुळे क्लाऊड सीडिंग या प्रक्रियेचा अवलंब केला जातो. या प्रक्रियेत विमान किंवा हेलिकॉप्टरच्या मदतीने ढगांमध्ये सिल्वर आयोडाइट किंवा पोटॅशियम आयोडाइड सारख्या घटनांचा समावेश केला जातो. यूएईच्या राष्ट्रीय हवामान विज्ञान केंद्राने सांगितल्यानुसार, सीडिंग विमानांनी दोन दिवसात सात वेळा उड्डाण केलं होतं. 
 

Advertisement