UK Grooming Gangs Scandal: ब्रिटनमधून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. ब्रिटीश खासदार रूपर्ट लो यांनी संसदेत देशातील सर्वात मोठ्या आणि भयंकर 'ग्रूमिंग गँग स्कँडल'बाबत (Grooming Gangs Scandal) असे काही खुलासे केले आहेत, ज्यामुळे संपूर्ण जग हादरले आहे. संसदेत पीडित मुलींच्या गवाही वाचताना खासदारांनी मांडलेली भीषण वास्तविकता कोणाच्याही अंगावर काटा आणणारी आहे.
'600 जणांनी माझ्यावर बलात्कार केला', संसदेत पीडितांचा टाहो
ग्रूमिंग गँग स्कँडल हे ब्रिटनमधील अनेक दशकांपासून चालणारे लैंगिक शोषणाचे एक संघटित गुन्हेगारी जाळे आहे. या प्रकरणात प्रामुख्याने पाकिस्तानी आणि दक्षिण आशियाई वंशाच्या पुरुषांचा समावेश आहे, ज्यांनी 11 ते 16 वर्षे वयोगटातील अल्पवयीन ब्रिटिश मुलींना लक्ष्य केले.
खासदार रूपर्ट लो यांनी स्वतः केलेल्या चौकशीच्या आधारावर संसदेत सांगितले की, अनेक वर्षांपासून या निष्पाप मुलींचा छळ सुरू असताना पोलीस आणि प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली.
पीडित मुलींच्या अंगावर काटा आणणारी साक्ष
संसदेत सादर करण्यात आलेल्या साक्षींनुसार, एका पीडितेने सांगितले की, तिच्यावर तब्बल 600 ते 700 वेगवेगळ्या पुरुषांनी बलात्कार केला. दुसऱ्या एका पीडितेने तिचे वय अवघे 12 ते 13 वर्षे असताना तिच्यावर झालेल्या अनन्वित अत्याचाराची माहिती दिली. इतकेच नाही, तर आरोपींनी एका लहान मुलाच्या चेहऱ्यावर जळती सिगरेट विझवल्यासारख्या अमानवीय कृत्यांच्या नोंदीही समोर आल्या आहेत.
( नक्की वाचा : मृत्यूला चकवा दिला, तालिबानी गोळ्या झेलल्या अन् अखेर एव्हरेस्ट गाठलं! अफगाणिस्तानच्या लेकीची थरारक शौर्यगाथा )
धार्मिक सणांवेळी वाढणारी क्रूरता
या शोषणामागे वांशिक द्वेष आणि धार्मिक छळ ही देखील मोठी कारणे असल्याचे उघड झाले आहे. पीडितांच्या म्हणण्यानुसार, गोऱ्या मुलींना मुद्दाम लक्ष्य केले जायचे. एका पीडितेने सांगितले की, तिने कुत्र्यांच्या पिंजऱ्यात 15 ते 20 ब्रिटिश मुलींना कोंडलेले पाहिले होते.
विशेष म्हणजे, ईद सारख्या सणांच्या काळात या अत्याचारांची तीव्रता आणि हिंसक पार्ट्यांचे प्रमाण अधिक वाढत असे, असे धक्कादायक दावे पीडितांनी केले आहेत. ख्रिस्ती मुलींच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी त्यांच्या श्रद्धेची चेष्टाही केली जात होती.
( नक्की वाचा : भारताचा सातवा दरवाजा ते मेक्सिकोचे पाताल लोक; या 7 जागा उघडण्याचं धाडस कोणतंही सरकार का करत नाही? )
पोलीस आणि प्रशासनावर गंभीर आरोप
या प्रकरणातील सर्वात खळबळजनक वळण म्हणजे खुद्द पोलिसांवरच झालेले आरोप. एका पीडितेने थेट साक्ष दिली की, देशाच्या वेगवेगळ्या भागांतील अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. स्थानिक प्रशासन, पोलीस आणि संस्थांनी पीडितांच्या तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष केले आणि उलट मुलींनाच दोषी ठरवले, असे अनेक अहवालांतून सिद्ध झाले आहे.
काय आहे हे 'ग्रूमिंग गँग' प्रकरण?
हे प्रकरण ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाणे आणि प्रदीर्घ काळ चाललेले बाल लैंगिक शोषण आहे. 2002 मध्ये पहिल्यांदा याचे संकेत मिळाले होते, मात्र 2010 मध्ये रॉदरहॅममधील प्रकरणानंतर याला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. रॉदरहॅम व्यतिरिक्त रोशडेल, ओल्डहॅम आणि टेलफोर्ड सारख्या शहरांमध्ये हे संघटित गिरोह सक्रिय होते. खासदार रूपर्ट लो यांच्या या स्वतंत्र चौकशीनंतर आता ब्रिटन सरकारने अधिकृत राष्ट्रीय तपास पथकाची घोषणा केली आहे.