iphone च्या एका फीचरमुळे मोडलं लग्न; व्यक्तीने कंपनीविरोधात ठोकला दावा

आयफोनच्या iMessages शी जोडलेलं हे प्रकरण आहे. द टाईम्सच्या रिपोर्टनुसार, एका व्यक्तीने त्याच्या घटस्फोटासाठी अॅपल कंपनीला दोषी ठरवले आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

iPhone च्या एका फीचरमुळे लग्न मोडल्याचा प्रकार समोर आला आहे. घटस्फोटाच्या घटनेनंतर पतीने अॅपल कंपनीविरोधात 6.3 मिलियन डॉलरचा दावा दाखल केला आहे.  इंग्लंडमध्ये ही घटना सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे.   

आयफोनच्या iMessages शी जोडलेलं हे प्रकरण आहे. द टाईम्सच्या रिपोर्टनुसार, एका व्यक्तीने त्याच्या घटस्फोटासाठी अॅपल कंपनीला दोषी ठरवले आहे. या व्यक्तीने एका सेक्स वर्कर सोबत केलेली चॅटिंग त्याच्या बायकोने वाचली. ज्यानंतर बायकोनी त्याच्यासोबत न राहण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतला. 

मात्र बायकोने आपले मेसेज वाचले कसे असा प्रश्न या व्यक्तीला पडला आहे. कारण सेक्स वर्करसोबत केलेली चॅटिंग त्याने डिलिट केली होती. मात्र तरीरी पत्नीला ही माहिती iMac द्वारे मिळाली.  आयफोनच्या फीचरमध्ये त्रुती आहेत असा आरोप त्याने केला आहे. 

(नक्की वाचा- OpenAI ने लॉन्च केलं ChatGPT-4o व्हर्जन, यूजर्सना स्वस्तात मिळणार अधिक वेगवान आणि नवीन फीचर्स)

मात्र या व्यक्तीला आयफोनमधील फीचर्सची नीट माहिती नव्हती. एकाच अॅपल आयडी सिंक असणाऱ्या सर्व डिव्हाईसेवर मेसेज सेव्ह राहतात, याची माहिती या व्यक्तीला नव्हती. त्यामुळे त्याने त्याच्या आयफोनमधून मेसेज डिलिट केले, मात्र आयमॅकवर हे मेसेज सेव्ह राहिले. जे नंतर त्याच्या पत्नीने वाचले. या एका चुकीमुळे त्याच्यावर ही नामुष्की ओढावली.   

Advertisement

अॅपलविरोधात ठोकला दावा

आता या पठ्ठ्याने अॅपलविरोधातच कायदेशीर लढाई सुरु केली आहे. व्यक्तीने म्हटलं की, आपण फोनमधून एखादी गोष्ट डिलिट केली म्हणजे ती कायमची डिलिट झाली असंच आपल्याला वाटतं. जर मेसेज डिलिट करताना कळालं असतं की हे मेसेज फक्त या डिव्हाईसमधून डिलिट झाले आहेत, तर आपल्या ते लक्षात तरी येईल. मात्र तसं देखील अॅपल डिव्हाईसमध्ये होत नाही.   

(नक्की वाचा- सांगली महापालिका आयुक्तांचं व्हिजिटिंग कार्ड होतंय व्हायरल, काय आहे खास?)

मात्र कंपनीने देखील या व्यक्तीला आयफोनमध्ये फीचरबाबत नीट माहिती नसल्याचं म्हटलं आहे. जर या व्यक्तीला अॅपलच्या फंक्शनबाबत माहिती असती तर त्याचा घटस्फोट झाला नसता. व्यक्तीचा असा समज आहे की त्यांच्या पत्नीने चुकीच्या पद्धतीने ही माहिती मिळवली. मात्र त्यांनी आपल्या पत्नीला नीट समजावलं असतं तर कदाचित त्यांचा घटस्फोट झाला नसता, असं कंपनीने म्हटलं आहे. 

Advertisement

Topics mentioned in this article