ट्रम्प, पॉर्न स्टार अन् 'गुप्त दान', डोनाल्ड आणि स्टॉर्मी डेनियल्स यांच्यात 'त्या' रात्री काय झालं?

ट्रम्प यांना शिक्षाही होवू शकते. त्यांना अटकही केली जाण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर ते अटक झालेले पहिले माजी राष्ट्रपती ठरतील.

Advertisement
Read Time: 4 mins
नवी दिल्ली:

अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकी आधी डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका लागला आहे. सेक्स स्कॅन्डल आणि तोंड बंद ठेवण्यासाठी दिलेले पैसे या प्रकरणातील सर्व 34 केसेसमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवण्यात आले आहे. ट्रम्प यांनी पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनियल्स हीने तोंड बंद ठेवावे. आपल्यातील नात्याबाबत कुठेही वाच्यता करू नये यासाठी पैसे दिले होते. हे दिलेले पैसे लपवण्यासाठी त्यांनी त्यांनी काही रेकॉर्डसमध्ये हेराफेरी केली होती असा त्यांच्यावर आरोप आहे. ट्रम्प यांना दोषी ठरवल्यानंतर त्यांना आता 11 जुलैला शिक्षा सुनावण्यात येईल. या प्रकरणात ट्रम्प यांना शिक्षाही होवू शकते. त्यांना अटकही केली जाण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर ते अटक झालेले पहिले माजी राष्ट्रपती ठरतील. 

ट्रम्प यांच्या विरोधात काय आहे प्रकरण? 

डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016 च्या निवडणुकी आधी पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनिएल्स हिला तब्बल 1 लाख 30 हजार डॉलर दिले होते. असा त्यांचावर आरोप आहे. अमेरिकेतील एका वर्तमान पत्राने दिलेल्या बातमी नुसार ट्रम्प यांचे वकील माइकल कोहेन यांनी पॉर्न स्टारला ही रक्कम दिली होती. शिवाय त्याच्या दोघांमधील संबंध सार्वजनिक करू नये असेही सांगितले होते. मात्र ही पॉर्न स्टार आपल्या संबंधांची माहिती आणखी एका वर्तमान पत्राला विकण्यासाठी तयारी होती. मात्र यावर काही होलू नये. तोंड बंद ठेवावं यासाठी तीला मोठी रक्कम देवू केली होती. या निवडणुकीत ट्रम्प यांना विजय मिळाला. पण हे प्रकरण काही थांबले नाही. ट्रम यांनी पॉर्न स्टारला पैसे देणे हे लिगल नव्हते. त्यांनी ते पैसे वकीलाची फी म्हणून दिल्याचे दाखवले होते. न्यूयॉर्क सरकारच्या वकीलांचा यावरच आक्षेप होता. यात हेराफेरी केली गेली आहे असा त्यांचा आरोप होता. त्यामुळेत त्या विरोधात गुन्हा दाखल झाला. 

Advertisement

पॉर्न स्टारचे सनसनाटी खुलासे 

या प्रकरणात पॉर्न स्टार डेनिएल्स ने काही सनसनाटी आरोप केले आहेत. 2007 मध्ये डोनाल्ड ट्रम्प पॉर्न स्टारला लॉस एंजलिसमध्ये भेटले होते. त्यावेळी ट्रम्प यांनी पहिल्यांदा लैंगिक संबध बनवण्यासाठी ऑफर दिली होती असा दावा तीने केला आहे. जेव्हा दोघे भेटले तेव्हा ट्रम्प यांनी आपण आणि आपली पत्नी वेगवेगळ्या रुममध्ये झोपतो असे सांगितल्याचेही डेनिएल्सने सांगितले आहे. त्यानंतर आपल्या दोघांमध्ये संबंध झाल्याचंही ती म्हणाली. 2011 मध्ये आपण ट्रम्प यांनी शेवटचे भेटलो होतो असे ती म्हणाले. त्यानंतर या दोघांच्या संबंधांची बातमी एका मासिकात छापली होती. पुढे कोर्टात याबाबत बोलताना आपल्यातील लैंगिक संबध लपवण्यासाठी ट्रम्प यांनी 30 हजार डॉलर दिले होते असे सांगितले. 

Advertisement

ट्रम्र यांच्यावर काय आहे आरोप? 

पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनिएल्सचा दावा आहे की ती  कॅलिफोर्निया आणि नवेदा यांच्या होणाऱ्या चॅरेटी गोल्फ स्पर्धे वेळी ट्रम्प यांना पहिल्यांदा भेटली होती. 2011 मध्ये तिने  'इन टच वीकली' एक मुलाकत दिली होती. ट्रम्प यांनी एका हॉटेलमध्ये आपल्याला जेवणासाठी बोलावल्याचा दावा केला होता. ज्यानेळी ती त्या हॉटेलमध्ये पोहोचली त्यावेळी ट्रम त्या रूममध्ये सोफ्यावर झोपून टीव्ही बघच होते. त्यांनी त्यावेळी एक पायजमा घातला होता. त्यानंतर लैगिक संबध झाल्याचे पॉर्न स्टारने सांगितले. त्यानंतर 2018 साली दिलेल्या मुलाखतीत ती म्हणजे की त्या दोघांमधल्या संबधा विषयी कुठेही बोलू नये यासाठी धमकी दिली होती. पॉर्नस्टारने ही मुलाखत 2011 साली दिली होती. मात्र ती प्रदर्शित 2018 साली झाली होती. मात्र यात करण्यात आलेले आरोप ट्रम्प यांचे वकील डेनिएल्ड यांनी फेटाळून लावले होते. 

Advertisement

ट्रम्प यांच्यावर आरोप करणारी स्टॉर्मी डेनिएल्स कोण?

स्टॉर्मी डेनिएल्स एक पॉर्न स्टार आहे. तिचा जन्म 1979 साली लुसियानामध्ये झाला होता. तिचे खरे नाव हे स्टेफनी क्लिफ़ोर्ड असे आहे. तिने करिअरची सुरूवात पॉर्न चित्रपटात एक अभिनेत्री म्हणून केली. त्यानंतर 2004 मध्ये ती रायटर -डायरेक्टरही झाली होती. तिने अनेक म्युझिक अल्बममध्येही काम केले आहे. त्यातून तिला खुप लोकप्रियता मिळाली होती. विशेष म्हणजे  स्टॉर्मी डेनिएल्स ही  2010 ममध्ये लुसियानामध्ये सीनेटची उमेदवारीही होती. आपल्याला कोणी गांभीर्याने घेत नाही म्हणून तिने या लढतीतून माघार घेतली होती. 

शिक्षा झाल्यास ट्रम्प निवडणूक लढवू शकतात का? 

डोनाल्ड ट्रम्प 2024 ची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे ट्रम यांच्या बाबत काय निर्णय येतो हे खुप महत्वाचे आहे. ट्रम यांच्यावर जर महाभियोग चालवला गेला तर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाईल. त्यानंतरही त्यांना निवडणूक लढण्यास कोणीही रोखू शकत नाही. जेलमध्ये राहून ते अमेरिकेचे राष्ट्राध्यपद सांभाळू शकतात. पण ट्रम्प यांना अटक झाली तर त्यांची राष्ट्रपती पदासाठी असलेल्या दावेदारीवर मोठा परिणाम होवू शकतो.