US-Iran War : अमेरिका की इराण; 4 महिन्यांच्या युद्धात शेवटी कोण जिंकलं? नेतान्याहू - पाकिस्तानला काय मिळालं?

शस्त्रसंधीमुळे कच्च्या तेलाच्या किमती कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर स्ट्रेट ऑफ होर्मुज सुरू होण्याची शक्यता आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

US-Iran War Ceasefire : गेल्या २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या युद्धाचा आता शेवट होत आहे. दोन्ही देश सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यास तयार झाले आहेत. या वृत्तामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. शस्त्रसंधीमुळे कच्च्या तेलाच्या किमती कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर स्ट्रेट ऑफ होर्मुज सुरू होण्याची शक्यता आहे. आता प्रश्न उपस्थित होतो की, चार महिन्यांच्या युद्धात विजय कुणाचा झाला आणि अमेरिका-इराण आणि मध्यस्थीचं स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानने युद्धातून काय मिळवलं? 

अमेरिकेबद्दल सांगायचं झालं तर इराणवरील हा पहिला हल्ला नव्हता. अमेरिकेने गेल्या वर्षी जूनमध्ये इराणच्या अणू ऊर्जा ठिकाणांवर लक्ष्य केलं होतं. त्यावेळी १२ दिवसांपर्यंत हे युद्ध सुरू होतं. इराणला अणू ऊर्जा अस्त्रे बनवू न देणं हा अमेरिकेचा स्पष्ट हेतू आहे. गेल्या वेळी झालेला हल्ला आणि त्यानंतर नुकत्याच झालेल्या युद्धामुळे इराणला या क्षेत्रात निश्चितच धक्का बसला आहे. इराणचा अणू ऊर्जा निर्मिती कार्यक्रमाला मोठा धक्का बसला आहे. युद्धानंतर हा कार्यक्रम पुन्हा उभा करणं इराणसाठी मोठं आव्हानात्मक काम आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Liquor News : जगभरात दारूची विक्री घटणार, पण भारतात मात्र मद्यबाजार तेजीत; काय आहे कारण?

मात्र दुसरीकडे अमेरिकेला या युद्धाचा फारसा फायदा झाल्याचं दिसत नाही. इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्लाह अली खामेनीच्या हत्याच्या माध्यमातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्ता परिवर्तनाची योजना करीत होते, ज्याला यश मिळू शकलं नाही. तर स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये इराणचा प्रभाव कमी करण्यासाठी अमेरिकाचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याचं दिसत आहे. अभ्यासकांनुसार, आता इराणचा होर्मूजवर आधीपेक्षा जास्त प्रभाव असल्याचं दिसतं. 

या युद्धातून पाकिस्तानला काय मिळालं?

या संपूर्ण प्रकरणात पाकिस्तान मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करीत होता. पाकिस्तानने दोन्ही देशातील नेत्यांना इस्लामाबादला बोलावलं, मात्र कोणताही सामंजस्य घडवून आणू शकले नाही. यानंतर शहबाज शरीफ आणि फिल्ड मार्शन आसिम मुनीर हे स्वत:ला इराणला जाऊन डिल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसले. मात्र याचा फारसा फायदा होऊ शकला नाही. दुसरीकडे ट्रम्प यांनी अनेक ठिकाणी पाकिस्तानचं कौतुक करीत होते. मात्र अनेक अमेरिकन अधिकारी आणि तज्ज्ञांनी पाकिस्तानच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. 

कोणाच्या पदरी आलं अपयश?

या युद्धात सर्वात मोठं अपयश इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या वाट्याला आलं. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनुसार, इस्त्रायचे पंतप्रधान केवळ हरले नाहीत तर त्यांची प्रतिष्ठाही डागाळली. इस्त्रायलला अमेरिकेच्या मदतीने इराणमधील अणुऊर्जा ठिकाणं नष्ट करायचं आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र नव्या सामंजस्य करारामुळे इस्त्रायचं स्वप्न अधूरं राहिलं. तर या आक्रमक युद्धामुळे इस्त्रायल आंतरराष्ट्रीय मंचावर वेगळा पडला आहे. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबाबात त्यांना लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या विरोधात आपलं अभियान अनेकदा रोखावं लागलं. 


 

Topics mentioned in this article