युद्धाचा सर्वात क्रूर चेहरा, खामेनींसोबत 14 महिन्यांच्या नातीचाही मृत्यू; कुटुंबातील आणखी कोणी गमावला जीव?

युद्धाचा वणवा जेव्हा पेट घेतो तेव्हा समोर कोण आहे, हे कुणी पाहत नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • अमेरिका-इजरायल के हमलों में ईरान के सुप्रीम लीडर खामेनेई और उनके परिवार के कई सदस्य मारे गए हैं
  • खामेनेई की 14 वर्षीय नातिन ज़हरा मोहम्मदी भी इस जंग में मारी गई है. खामेनेई के कई और रिश्तेदार मारे गए हैं
  • खामेनेई को मारने के लिए अमेरिका-इजरायल ने उनके अति सुरक्षित अंडरग्राउंड बंकर पर 30 बम बरसाए थे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

US Israel Attack On Iran : युद्धाचा वणवा जेव्हा पेट घेतो तेव्हा समोर कोण आहे, हे कुणी पाहत नाही. युद्ध कोणाचाही चेहरा ओळखत नाही न नात्याची मर्यादा. जेव्हा या युद्धामध्ये निरपराध आणि निष्पाप लोकांचा जीव जातो तेव्हा या युद्धाचा सर्वात भीतीदायक चेहरा समोर येतो. अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमधील युद्धातही असंच काहीस घडलं आहे.

या युद्धात इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. याशिवाय त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचा या युद्धात जीव गेला. यामध्ये जहरा मोहम्मदी या निष्पाप चिमुरडीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अवघ्या १४ महिन्यांची जहरा अयातुल्ला अली खामेनी यांची नात होती. अमेरिका-इस्त्रायलच्या हल्ल्यात जहरासोबत तिच्या आई-वडिलांचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे.

निष्पाप जहराचा मृत्यू...

जहराला तर काही कळतही नव्हतं. आजूबाजूला नेमकं काय घडतंय हेदेखील तिला कळत नव्हतं. असं म्हणतात युद्धाच्या मैदानात घेतलेल्या निर्णयाचा फटका अशा लोकांनाही भोगावा लागतो ज्यांचा या युद्धाशी काहीही संबंध नसतो. जहराच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. या युद्धात खामेनींच्या कुटुंबातून जीव गमावणाऱ्यांमध्ये केवळ जहराच नाही, तर खामेनी यांचाही याच मृत्यू झाला. त्यांचं अतिसुरक्षित अंडरग्राऊंड कंपाऊंडवर कमीत कमी ३० बॉम्ब टाकण्यात आले. बंकरमध्ये लपलेले असताना खामेनी यांचा जीव वाचला नाही.

टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, खामेनी यांना दोन मुली होत्या. बुशरा खामेनी आणि होदा खामेनी. दोघीही राजकारण आणि मीडियापासून दूर होत्या. त्यामुळे मीडियामध्ये फारशा गोष्टी समोर येऊ शकल्या नाहीत. बुशरा हिचा निकाह मोहम्नद मोहम्मदी गोलपायेगनीसोबत झालं होतं. १४ महिन्याची जहरा मोहम्मदी यांचीच मुलगी होती. खामेनी यांची दुसरी मुलगी होदा हिचा निकाह मिस्बाह अल-होदा बघेरी कानी याच्यासोबत झाला होता.

Advertisement

तेहरान सिटी कौन्सिल मेंबर मयसम मुजफ्फर यांनी मीडियाला सांगितलं, या हल्ल्यात खामेनी यांचा जावई मिस्बाह अल होदा बघेरी कानी आणि त्यांची पत्नी जहरा हद्दा अदेल यांचा मृत्यू झाला. इराणचे सरकारी मीडियामध्ये दिल्यानुसार, खामेनी यांच्या मुलीचाही यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती आहे.