US military plane missing Iran : पश्चिम आशियातील तणाव शिगेला पोहोचलेला असतानाच एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. इराणच्या सीमेजवळ पर्शियन आखातावरून उड्डाण करणारे अमेरिकेचे एक लष्करी विमान अचानक बेपत्ता झाले आहे. अमेरिकन वायुसेनेच्या या बोइंग केसी-135 स्ट्रॅटोटँकर विमानाने संपर्क तुटण्यापूर्वी 7700 हा आणीबाणीचा संदेश (इमर्जन्सी सिग्नल) दिला होता. या घटनेमुळे संपूर्ण जागतिक संरक्षण वर्तुळात खळबळ उडाली असून नेमकं काय घडलं असावं, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
कुठे झालं विमान बेपत्ता?
फ्लाइटराडार 24 च्या आकडेवारीनुसार, या अमेरिकन विमानाने संयुक्त अरब अमीरात (यूएई) मधील अल धाफरा हवाई तळावरून उड्डाण केले होते. हे विमान मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या लष्करी मोहिमांच्या मदतीसाठी तैनात होते. मात्र, कतरच्या आकाशात पोहोचल्यावर या विमानाचा संपर्क तुटला. बेपत्ता होण्यापूर्वी हे विमान काही काळ हवेत घिरट्या घालत असल्याचे ट्रॅकिंग डेटावरून दिसून आले आहे.
( नक्की वाचा : JPMorgan :'माझ्यासोबत झोपला नाहीस तर संपवून टाकेन'; बड्या कंपनीच्या महिला बॉसच्या धमकीने भारतीय तरुण उद्ध्वस्त )
इमर्जन्सी सिग्नलचा अर्थ काय?
विमानाने जारी केलेला 7700 हा कोड तांत्रिक बिघाड किंवा उड्डाणादरम्यान आलेल्या गंभीर संकटाचे संकेत देतो. आणीबाणी जाहीर केल्यानंतर हे विमान इराणच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर असताना गायब झाले. या घटनेमागे काही घातपात आहे की केवळ तांत्रिक बिघाड, याची अधिकृत पुष्टी अद्याप अमेरिकन लष्कराकडून करण्यात आलेली नाही.
विशेष म्हणजे, इराणच्या फार्स या निमशासकीय वृत्तसंस्थेनेही हे विमान बेपत्ता झाल्याचे वृत्त दिले आहे, मात्र यात इराणचा कोणताही सहभाग असल्याचे अद्याप समोर आलेले नाही.
( नक्की वाचा : 8th Pay Commission News: पगार 30 की 40 टक्क्यांनी वाढणार? 8 व्या वेतन आयोगाचे सर्व अपडेट्स; वाचा एकाच ठिकाणी )
का महत्त्वाचे आहे हे विमान?
बेपत्ता झालेले केसी-135 स्ट्रॅटोटँकर हे साधे विमान नाही. हे अमेरिकन हवाई दलासाठी हवेतील फिरते 'फ्युएल स्टेशन' म्हणून काम करते. या विमानातून लढाऊ विमाने आणि बॉम्बर विमानांना हवेतच इंधन भरले जाते, ज्यामुळे ती विमाने दीर्घकाळ आणि लांब पल्ल्यापर्यंत मोहीम राबवू शकतात.
हे विमान 4 टर्बोफॅन इंजिनवर चालते आणि बोइंग 707 च्या डिझाइनवर आधारित आहे. जवळपास 60 वर्षांहून अधिक काळ हे विमान अमेरिकन लष्कराचा कणा मानले जाते.
🔴 یک فروند هواپیمای سوخترسان KC-135R نیروی هوایی ایالات متحده آمریکا که از پایگاه هوایی الظفره امارات برخاسته بود، در حین پرواز بر فراز خلیج فارس، کد اضطراری ۷۷۰۰ را مخابره کرد.
— خبرگزاری فارس (@FarsNews_Agency) May 5, 2026
🔹ارسال این کد به معنای وجود یک وضعیت اضطراری و فوری است که نیاز به فرود دارد. pic.twitter.com/o3HBB660hs
मोठ्या प्रमाणावर मालवाहतुकीची क्षमता
केसी-135 विमान केवळ इंधन भरण्यासाठीच नाही, तर 37,600 किलोग्रॅमपर्यंत माल किंवा डझनभर प्रवाशांची ने-आण करण्यासाठीही वापरले जाते. तसेच युद्धभूमीवरून जखमी सैनिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी (एअर मेडिकल इव्हॅक्युएशन) याचा मोठा वापर होतो.
हे विमान गायब होणे हा अमेरिकन लष्करासाठी मोठा धक्का मानला जात आहे, कारण मार्च महिन्यातही अशाच प्रकारचे एक विमान इराकच्या भागात गमावल्याची घटना घडली होती.
संपूर्ण जगाचं लक्ष
इराण आणि अमेरिका यांच्यातील संबंध आधीच ताणलेले असताना ही घटना घडली आहे. इराण समर्थक सशस्त्र गटांनी यापूर्वी अमेरिकन विमानांवर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती, त्यामुळे या ताज्या घटनेमागेही कोणी आहे का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या अमेरिकन लष्कराने यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र पर्शियन आखातातील हालचालींकडे आता जगाचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world