अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात कराबाबबत आणखी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी आयतीवर आणखी एक यू टर्न घेतलाय. ट्रम्प यांनी यापूर्वी आयात करावर 90 दिवसांची स्थगिती दिली होती. त्यानंतर स्मार्टफोन, कॉम्पयुटर, चिप्स या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील आयात कराला सवलत दिली आहे. या निर्णयाचा अमेरिकन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण, आता या वस्तूंच्या किंमती वाढणार नाहीत. त्याचबरोबर या निर्णयाचा अॅपल, सॅमसंग सारख्या दिग्गज कंपन्यांसह बड्या इलेक्ट्रॉनिक कंपन्यांना फायदा होणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ट्रम्प सरकारनं प्रसिद्ध केलेल्या नोटिशीनुसार मोबाईल फोन, लॅपटॉप, हार्ड ड्राईव्ह, कॉम्पयुटर प्रोसेसर आणि मेमरी चिप्स यांना आयत करातून बाहेर ठेवण्यात आलं आहे. हे साहित्य साधरणत: अमेरिकेत बनत नाही. हे बनवण्यास सुरुवात केली तरी त्यासाठी अनेक वर्ष लागू शकतात.
त्याचबरोबर सेमी कंडक्टर बनवणाऱ्या मशिनच्या आयता करावरही सूट देण्यात आली आहे. त्याचा फायदा TSMC सारख्या कंपन्यांना होईल. ही कंपनी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. या निर्णयाचा अन्य चिप बनवणाऱ्या कंपन्यांनाही दिलासा मिळणार आहे.
( नक्की वाचा : US Tariff : टॅरीफ वॉरमुळे माकडे महाग, अमेरिकेचा जालीम 'डोस' भारी पडणार )
90 दिवसांची स्थगिती
डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी चीन सोडून उर्वरित जगासाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. चीन सोडून जगावरील आयात कराला 90 दिवसांची स्थगिती देण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. भारतावरही लावण्यात आलेल्या आयात कराला ट्रम्प यांनी स्थगिती दिली आहे. भारताला मोठा दिलासा देणाऱ्या ट्रम्प यांनी चीनबाबतचे कठोर धोरण कायम ठेवले आहे.
चीनी मालावर 125 टक्के कर लावण्याचा निर्णय ट्रम्प यांनी केला आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी चीनवर 104 टक्के कर लावला होता. आता त्यावर आणखी 21 टक्के कर वाढवला आहे. जगातली 75 देशांनी अमेरिकेशी संपर्क साधला होता. त्या देशांना दिलासा देण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला आहे. त्यामुळे आगामी 90 दिवस या देशांना सवलत देण्याचा निर्णय ट्रम्प यांनी जाहीर केला होता.