भारत आणि पाकिस्तानदरम्यान शस्त्रबंदीच्या करारावर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर एक पोस्ट लिहिली आहे. ते म्हणाले की, मला आनंद आहे की दोन्ही देशांनी सामंजस्याने हा करार केला. ट्रम्प पुढे असंही म्हणाले की, या ऐतिहासिक आणि धाडसी निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी अमेरिका मदत करू शकला याचा आनंद आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प पुढे लिहितात, मला भारत आणि पाकिस्तानच्या मजबूत नेतृत्वावर अभिमान आहे. त्यांनी आपली ताकद, समजूतदारपणा आणि हिम्मत दाखवित दोन्ही देशातील तणाव मिटवण्याचा प्रयत्न केला. हा तणाव लाखो लोकांच्या मृत्यूचं आणि विनाशाचं कारण ठरू शकला असता. यामध्ये लाखो निष्पाप लोक मारले गेले असते. तुमच्या धाडसी पावलामुळे तुमचा वारसा अधिक मजबूत झाला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे लिहिलं, या ऐतिहासिक आणि धाडसी निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी अमेरिका तुम्हाला मदत करू शकली याचा मला सार्थ अभिमान वाटतो. यावर फारशी चर्चा झाली नाही. परंतु मी दोन्ही देशांसोबत व्यापार वाढवणार आहे. याशिवाय मी तुम्ही दोघांशी मिळून हजारो वर्षांनंतर काश्मीरच्या मुद्द्यावरील उपाययोजनेसाठी प्रयत्न करेन. भारत आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाला या अद्भूत कामासाठी ईश्वर तुम्हाला देवो.