नागपूरच्या (Nagpur News) दिव्या देशमुखने जागतिक बुद्धिबळात मोठी कामगिरी केली आहे. लंडनमध्ये झालेल्या वर्ल्ड टीम ब्लिट्झ अजिंक्यपद स्पर्धेत दिव्याने जगातील पहिल्या क्रमांकावरील (World Team Blitz Championships, London) महिला बुद्धिबळपटू हाऊ यिफान हिला पराभूत करत इतिहास रचला आहे. उपांत्य फेरीतील दुसऱ्या टप्प्यात दिव्याने हा सामना जिंकला. तब्बल 74 चालींच्या या लढतीत यिफान हिने अखेरच्या टप्प्यात एक चूक केली आणि दिव्याने ती संधी साधत सामना आपल्या नावावर केला. तिचा हा विजय तिच्या संयम, कौशल्य आणि आत्मविश्वासाचं प्रतीक ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करीत दिव्याचं कौतुक केलं आहे. (Who is divya deshmukh ?)
दिव्या देशमुख हिचा जन्म २००५ साली नागपूरमध्ये झाला. लहानपणापासूनच तिला बुद्धिबळाची खूप आवड होती. ५ व्या वर्षीच तिने बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. आई-वडिलांनी तिचा उत्साह ओळखून तिला योग्य मार्गदर्शन दिलं. देशमुख कुटुंबीय व्यवसायाने डॉक्टर आहे. नागपूरच्या भारतीय विद्या भवन्स सिव्हिल लाईन्स शाळेची विद्यार्थिनी आहे. लहान वयात मोठं यश अगदी लहान वयातच दिव्याने शालेय, जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धा जिंकायला सुरुवात केली. पुढे तिने राष्ट्रीय स्पर्धांमध्येही जबरदस्त कामगिरी केली. भारताच्या टीममध्येही निवड झाली आणि तिने परदेशातही स्पर्धा जिंकल्या.
अशी बनली महिला ग्रँडमास्टर
सतत मेहनत करून, २०२१ साली दिव्या ‘महिला ग्रँडमास्टर' (WGM) बनली. ही बुद्धिबळातील मोठी उपाधी आहे. ती भारतातल्या सगळ्यात तरुण ग्रँडमास्टरपैकी एक आहे. दिव्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि तिथेही तिचा खेळ खूप चमकला. तिला खूप पदके आणि ट्रॉफी मिळाल्या. २०२५ मध्ये तिने ऐतिहासिक विजय मिळवला. २०२५ मध्ये लंडनमध्ये "World Team Blitz Championship" झाली. या स्पर्धेत दिव्याने जगातल्या नंबर 1 महिला खेळाडू – हो यिफान (चीन) हिला हरवलं. ही खूप मोठी गोष्ट होती. सगळं जग तिच्याकडे पाहू लागलं. दिव्याच्या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिचं कौतुक केलं. तिच्यानया यशामुळे संपूर्ण भारताला अभिमान वाटतोय. दिव्या आता पूर्ण ग्रँडमास्टर बनण्यासाठी मेहनत करत आहे.