Worlds Biggest Thief: जगातील सर्वात मोठा चोर..गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद,आख्यायिका वाचून थक्क व्हाल

ही कहाणी आहे स्टीफन ब्लमबर्गची..ज्यांना पुस्तकांशी असं प्रेम झालं की,त्यांनी लायब्ररीच रिकामी केली.जवळपास 23600 महागडी पुस्तके आणि 19 टन वजन..जाणून घेऊयात या आगळ्या वेगळ्या बुक लव्हरची आख्यायिका.

जाहिरात
Read Time: 2 mins
Worlds Biggest Thief Viral Story

Stephen Blumberg Guinness Record: ही कहाणी आहे स्टीफन ब्लमबर्गची..ज्यांना पुस्तकांशी असं प्रेम झालं की,त्यांनी लायब्ररीच रिकामी केली.जवळपास 23600 महागडी पुस्तके आणि 19 टन वजन..जाणून घेऊयात या आगळ्या वेगळ्या बुक लव्हरची आख्यायिका.जी वाचून तुम्हीही म्हणाल,भावा..'ही तर लय भारी मिस्ट्री आहे'. 

अमेरिकेच्या स्टीफन ब्लूमबर्ग यांना जग बुक थीफ च्या नावानं ओळखतात.पण ते स्वत:ला पुस्तकांचे रक्षक मानायचे.1970 ते 1990 दरम्यान ब्लूमबर्ग यांनी उत्तरी अमेरिकेच्या 45 राज्यात आणि कॅनडाच्या 268 लायब्ररीसोबत संपर्क ठेवला होता.त्यांनी छोटी मोठी नाही,तर अशी दुर्मिळ पुस्तकं चोरली,ज्यांची किंमत कोट्यावधी रुपयांत होती.त्यांच्याकडे मिळालेल्या पुस्तकांचं एकूण वजन 19 टन होतं.त्याने पुस्तकांना विकलं नाही.तर त्यांच्या घरात भिंती आणि अलमारीत सजवून ठेवलं. 

Advertisement

नक्की वाचा >> Sambhajinagar News: छत्रपती संभाजी नगरात भयंकर घटना, नगरसेवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न, CCTV व्हिडीओमुळे खळबळ

पुस्तकांच्या प्रति ब्लमबर्गची आवड

ब्लूमबर्ग कोणी साधा चोर नव्हता,त्याच्याकडे परफेक्ट प्लॅन असायचा.पहिल्या दिवशी लायब्ररीचा काना कोपरा पाहायचा. नकाशा समजून घ्यायचा आणि पुन्हा रात्रीच्या अंधारात त्याचं काम पूर्ण करायचा.त्याने अनेक खोटे आयडी बनवले होते. कधी कधी तर तो स्टाफच्या चाव्या सुद्धा चोरायचा. त्याला बालपणीच त्याच्या कौशल्याची चुणूक लागली होती.ज्यामुळे तो माणसांपेक्षा जास्त पुस्तकांशी मैत्री करायचा.त्याला वाटायचं की,मोठ मोठ्या संस्था या किंमती पुस्तकांचं आदर करत नाहीत.यामुळे त्यांना सुरक्षित ठेवायची जबाबदारी त्यांची आहे. 

नक्की वाचा >> Pune News: PMPML च्या अध्यक्षांच्या कारला भीषण अपघात,मुंबईहून पुण्याकडे निघाले अन् त्या रोडवर घडलं असं काही..

चोरी करायची अनोखी पद्धत 

प्रत्येक चोराचा एक ना एक दिवस शेवट होतोच.ब्लमबर्गचं सीक्रेट त्याचाच साथीदार केनेथ रोड्सने बाहेर काढलं.ज्याने लोभापोटी एफबीआयला सर्वकाही सांगितलं.20 मार्च 1990 रोजी पोलीस जेव्हा त्यांच्या घरी पोहोचले,तेव्हा तेथील नजारा पाहून ते थक्क झाले. बाथरूमपासून किचनपर्यंत फक्त पुस्तकच पुस्तके होती. 1991 मध्ये त्यांना दोषी ठरवलं आणि 71 महिन्यांचा तुरुंगवास झाला.