पठाणकोटमध्ये दहशतवाद्यांशी सामना, गुप्त अभियानांचा भाग; गाझात निवृत्त कर्नल वैभव काळेंना वीरमरण

काळे यांनी काश्मिरमधील ११ जम्मू-काश्मीर रायफल्सचं नेतृत्व केलं आहे. ते गुप्त आणि दहशतवादी विरोधी अभियानांचा भाग होते.

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

इस्त्रायल-हमास युद्धादरम्यान गाझाच्या राफा शहरात झालेल्या हल्ल्यात काही महिन्यांपूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात संरक्षण समन्वय अधिकारी म्हणून काम पाहणारे निवृत्त लष्कर अधिकारी कर्नर वैभव काळे यांचा मृत्यू झाला आहे.  46 वर्षांचे कर्नल वैभव अनिल काळे यांनी दोन वर्षांपूर्वी 2022 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यांची दोन महिन्यांपूर्वी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात सुरक्षा समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

भारतीय सैन्यात कधी झाले होते सामील?
काळे यांनी काश्मिरमधील ११ जम्मू-काश्मीर रायफल्सचं नेतृत्व केलं आहे. ते गुप्त आणि दहशतवादी विरोधी अभियानांचा भाग होते. भारतीय लष्करात सामील होण्यासंबंधात काळेंबद्दल अनेक माहिती समोर येत आहे. त्यांचे नातेवाईक निवृत्त विंग कमांडर प्रशांत करडे यांनी सांगितलं की, निवृत्त कर्नल अनिल काळे 1998 मध्ये भारतीय सैन्यात सामील झाले होते. त्यांनी 2009 आणि 2010 दरम्यान संयुक्त राष्ट्रात आकस्मिक मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणूनही काम केले होते.

काळे यांच्या सोशल मीडिया लिंक्डइनवर दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2004 मध्ये ते भारतीय सैन्यात सामील झाले होते. त्यांनी 2009 ते 2010 पर्यंत संयुक्त राष्ट्रात मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून काम केलं. वैभव अनिल काळे हे महाराष्ट्रातील नागपुरातील राहणारे होते. त्यांनी शालेय शिक्षण सोमलवार उच्च माध्यमिक शाळेतून पूर्ण केलं. त्यांनी पुढील शिक्षण IMM लखनऊ आणि इंदूरसह अन्य संस्थांमधून पूर्ण केलं होतं. त्यांनी जेएनयूमधून वर्तनशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकर कायद्याची पदवी मिळवली होती.  

नक्की वाचा - मूळचे नागपूरचे कर्नल वैभव काळे यांना गाझातील हल्ल्यात वीरमरण

टीओआयमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, वैभव काळे हे अकादमीच्या 97 व्या कोर्सच्या नोव्हेंबर स्क्वाड्रनमधून होते. ते 1999 मध्ये एनडीएमून पासआऊट झाले होते. आयएमएमधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी 2000 मध्ये भारतीय सैन्यात सामील झाले. वैभव काळे यांचे बंधू विशाल काळे भारतीय हवाई सैन्यात ग्रुप कॅप्टनच्या पदावर तैनात आहेत. तर त्यांचे चुलत भाऊ अमेय काळेदेखील सैन्यात कर्नल आहेत.

Advertisement

निवृत्त कर्नल वैभव अनिल काळे महूमध्ये सैन्याच्या इन्फँट्री शाळेत कोच होते. सोमवारी सकाळी, राफामधील 'युरोपियन हॉस्पिटल'मध्ये UNDSS कर्मचाऱ्यांसोबत UN वाहनातून प्रवास करत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. यातच त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी अमृता, दोन मुलं असं परिवार आहे. लष्करातून निवृत्ती घेतल्यानंतर ते कुटुंबासह पुण्यात राहत होते. काळे यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येईल.

पठाणकोट एअरबेस हल्ला रोखण्यात  काळेंचा संबंध
टीओआयमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पठाणकोट एअरबेसवर 2016 मध्ये झालेला दहशतवादी हल्ला रोखण्यात वैभव काळेंचीही महत्त्वाची भूमिका होती. त्यांचे जवळचे मित्र लेफ्टनंट कर्नल हांगे यांनी सांगितलं की पठाणकोट हल्ल्याच्या वेळी काळे हे भारतीय लष्कराच्या 11 जम्मू-काश्मीर रायफल्स बटालियनचे नेतृत्व करीत होते. त्या ऑपरेशनमध्ये त्यांनी आणि त्यांच्या युनिटने महत्त्वाची भूमिका बजावली. कर्नल हांगे सांगतात की, वैभव काळे हा आनंदी माणूस होता. राफा येथील 'युरोपियन हॉस्पिटल'मध्ये जात असताना वाहनाने धडक दिल्याने त्यांचं निधन  झालं.

Advertisement