Osman Hadi: कोण होता उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूनंतर बांगलादेशमध्ये पेटला हिंसाचार, भारताशी काय आहे संबंध?

Who Was Sharif Osman Hadi : बांगलादेशमध्ये गेल्या वर्षी झालेल्या विद्यार्थी आंदोलनाचा प्रमुख चेहरा आणि 'इन्कलाब मंचा'चा प्रवक्ता शरीफ उस्मान हादीचे सिंगापूरमध्ये निधन झाले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Sharif Osman Hadi : रीफ उस्मान हादीच्या मृत्यूनंतर बांगलादेशमध्ये अंशातता निर्माण झाली आहे.
मुंबई:

Who Was Sharif Osman Hadi : बांगलादेशमध्ये गेल्या वर्षी झालेल्या विद्यार्थी आंदोलनाचा प्रमुख चेहरा आणि 'इन्कलाब मंचा'चा प्रवक्ता शरीफ उस्मान हादी  याचे सिंगापूरमधील रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले आहे. 

गेल्या आठवड्यात ढाका येथे निवडणूक प्रचारादरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी हादीच्या डोक्यात गोळी झाडली होती. सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्याची प्राणज्योत मालवली असून, या घटनेमुळे संपूर्ण बांगलादेशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी उशिरा दिलेल्या माहितीनुसार, हादीवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखम झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ढाका येथील डॉक्टरांनी हादीची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगितल्यानंतर, मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने त्याला एअर अँब्युलेन्सद्वारे सिंगापूरला हलवले होते.

सिंगापूरमधील डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र 18 डिसेंबर 2025 रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला. सिंगापूर सरकार आता हादीचा मृतदेह ढाका येथे पाठवण्यासाठी बांगलादेश उच्चायुक्तांना मदत करत आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Dhurandhar: रहमत डकैतचा अंत सिनेमात दाखवला तसाच झाला होता का? वाचा 'Reel vs Real' स्टोरी )
 

कोण होता उस्मान हादी?

32 वर्षांचा उस्मान हादी हा बांगलादेशातील शेख हसीना यांचे 15 वर्षांचे शासन उलथवून लावणाऱ्या विद्यार्थी उठावातील एक महत्त्वाचा नेता होता. तो 'इन्कलाब मंच' या कट्टरपंथी गटाचा वरिष्ठ नेता होता, ज्याने अवामी लीगला सत्तेतून हटवण्यासाठी मोठी भूमिका बजावली होती.

उस्मान हादी हा भारतविरोधी भूमिकेसाठी ओळखला जात असे. त्याने अनेकदा सोशल मीडियावर 'ग्रेटर बांगलादेश'चा नकाशा प्रसिद्ध केला होता, ज्यामध्ये भारताच्या काही भूभागांचा समावेश करण्यात आला होता. मोहम्मद युनूस सरकारने त्याच्या पक्षावर बंदी घातली असली, तरी हादी आगामी सार्वत्रिक निवडणुकीत ढाका-8 मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत होता.

Advertisement

( नक्की वाचा : VIDEO: पुतीन यांनी शहबाज शरीफ यांना 40 मिनिटे ताटकळत ठेवले; मग चिडलेल्या पंतप्रधानांनी जे केले, ते पाहून... )
 

हल्ल्याची पार्श्वभूमी 

हादीच्या निधनाची बातमी समजताच ढाका आणि बांगलादेशाच्या इतर भागांमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करत ठिकठिकाणी निदर्शने केली जात आहेत. 

12 डिसेंबर रोजी ढाक्यातील पलटन भागात रिक्षामधून प्रवास करत असताना हल्लेखोरांनी हादीवर गोळीबार केला होता. या हल्ल्यानंतर बांगलादेश पोलिसांनी दोन संशयितांचे फोटो जारी केले असून त्यांच्याबद्दल माहिती देणाऱ्यास 50 लाख टका (सुमारे 42,000 डॉलर्स) बक्षीस जाहीर केले आहे. तसेच, आरोपी देशाबाहेर पळून जाऊ नयेत म्हणून सीमा सुरक्षा दलाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

Advertisement

बांगलादेशात राष्ट्रीय शोक जाहीर

मोहम्मद युनूस यांनी उस्मान हादीच्या निधनावर शोक व्यक्त केला असून शनिवारी बांगलादेशात एक दिवसाचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. या दिवशी सर्व सरकारी, निमसरकारी आणि खासगी इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येतील. तसेच शुक्रवारी जुम्माच्या नमाजानंतर विशेष प्रार्थना आयोजित करण्यात आली आहे. 

सरकारने हादीच्या कुटुंबाची आणि त्याच्या मुलाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, या हल्ल्याचा संबंध भारताशी जोडण्याचा प्रयत्न काही कट्टरपंथीयांकडून केला जात होता, मात्र भारताने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हादीच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा खोटा नरेटिव्ह पसरवला जात असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.