एखाद्या माणसानं कुणाला तरी गंडवल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकतो. पण निसर्गानं एखाद्याला किंवा एखाद्या देशालाच फसवलं तर. सरलेल्या वीकेंडला असचं काहीसं चीनमध्ये घडलंय. शनिवार आणि रविवारी वर्षातलं 13 चक्रीवादळ दक्षिण चीनला धडकेल असा अंदाज होता. ताशी 200 किमी वेगानं वारं वाहतील असही सांगण्यात आलं. पण वादळानं वाट वळवली. एक प्रकारे धोका टळला. पण चीनची अख्खी यंत्रणा कामाला लागली. वादळ मात्र आता व्हिएतनामला धडकणार आहे. चीनला ज्या काजिकी चक्रीवादळानं कसं गंडवलं ते आपण पाहूयात. हैनान प्रांतातील समुद्र किनारी शेकडो योट्स पार्क करण्यात आल्या होत्या. पुढील काही तासात दक्षिण चीनी समुद्रात गुन्गाक्शी आणि हैनान या दोन प्रांतांच्या जवळ समुद्र किनारी वर्षातलं 13 चक्रीवादळ धडकणार होतं. या चक्रीवादळाचं नावं काजिकी असून पुढील काही काळात ते किनाऱ्यावर धडकेल असा अंदाज होता. वादळ येण्यापूर्वीच प्रशासनानं अनेक खबरदारी उपाय योजण्यास सुरुवात केली. गुन्गाक्शी सागरी सुरक्षा प्रशासनं वादळाची तीव्रता बघता लेव्हल 4ची आपातकालीन स्थिती ही जाहीर केली.
या वादळाला तोंड देण्यासाठी चीनमध्ये चार स्तरीय आपतकालीन व्यवस्थापना तयार करण्यात आली आहे.यातील लेव्हल 1 ही सर्वात तीव्र तर लेव्हल तर 4 ही सर्वात कमी तीव्रतेचा स्तर मानला जातो. दुसरीकडे चीनमधील पूर नियंत्रण मुख्यालयानंही हैनान प्रांतासाठी लेव्हल 4 ची आपातकालीन स्थित जाहीर केली. एक पूर नियंत्रण पथक आणि त्यांच्यासोबत पूरस्थितीत आवश्यक असणारं साहित्य हैनान प्रांतत पाठवण्यात आलं. शनिवारी संध्याकाळपासून हैनान प्रांतातील सगळी बंदरं बंद करण्यात आली होती. काजीकी चक्रीवादळ ताशी 25 किमी वेगानं किनाऱ्याकडे वाटचाल करेल आणि आणखी मजबूत होईल असा अंदाज होता.
नक्की वाचा - Good News: महिलांना 'या' रुग्णालयात मिळणार मोफत उपचार, कुठे सुरू झाले असे हॉस्पिटल?
रविवारी हे वादळ किनाऱ्यापासून जवळपास 500 किमी अंतरावर होतं. त्यावेळी वादळी वाऱ्याचा वेग ताशी 54 किलोमीटर होता. रविवारी रात्री हैनान प्रांताच्या बहुतांश भागात जोरदार पावसानं हजेरी लावली. पण वादळ मात्र किनाऱ्यावर न धड़कता समुद्रातूनच व्हिएतनामच्या दिशेनं पुढे निघून गेलं. तरी खबरदारीचा उपाय म्हणून 20 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. हैनान प्रांतसह चीनमधील ग्वांगडांगलाही वादळी पावसाचा फटका बसला. रात्रभरात जवळपास 14 इंच पावसाची नोंद झाली. यावेळी ताशी 162 किमी वेगानं वारे वाहत होते.
नक्की वाचा - Ladki Bahini Yojana: राज्यातील आणखी 26 लाख लाडक्या बहिणी ठरणार अपात्र? यादी आली समोर
चीनवरचा धोका टळला असला, तरी सोमवारी हे वादळ व्हिएतनामच्या किनाऱ्याकडील प्रदेशाला धडकण्या आधी जोरदार पावसाचा फटका बसला. व्हिएतनामच्या विविध भागात काजिकी वादळामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. व्हिएतनामच्या अधिकाऱ्यांनी दोन विमानतळावरील कामकाज बंद करण्यात आलं आहे. हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. वादळाशी लढण्यासाठी व्हिएतनामचं लष्कर देखील उतरवण्यात आलं आहे.