जाहिरात

Good News: महिलांना 'या' रुग्णालयात मिळणार मोफत उपचार, कुठे सुरू झाले असे हॉस्पिटल?

सध्या रुग्णसेवा मोठ मोठ्या रुग्णालयात प्रचंड महाग झाली आहे. त्यामुळे अशा रुग्णालयात जाताना सर्व सामान्य नेहमी दहा वेळा विचार करतात.

Good News: महिलांना 'या' रुग्णालयात मिळणार मोफत उपचार, कुठे सुरू झाले असे हॉस्पिटल?
पनवेल:

राहुल कांबळे 

महिलांना मोफत उपचार देणाऱ्या रुग्णालयाचे उद्घाटन महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. या रुग्णालयामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. उरण व पनवेल मतदारसंघामध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये करंजाडे येथे नव्याने उभारण्यात आलेल्या आदिती लाईफ केअर रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चे युवा सचिव अक्षय देवकर यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेले हे रुग्णालय परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. या रुग्णालयाची विशेषता म्हणजे महिलांसाठी मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या प्रसंगी बोलताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, “करंजाडे परिसरात चांगल्या पद्धतीचे हे रुग्णालय सुरू झाले असून हे परिसरातील सर्वात मोठे रुग्णालय ठरणार आहे. आजूबाजूच्या भागातील नागरिक, तसेच प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे वाढणारी लोकसंख्या, यांना याचा मोठा फायदा होणार आहे. महिलांसाठी मोफत उपचार सुविधा ही या रुग्णालयाची खासियत असेल असं ही त्या यावेळी म्हणाल्या. या रुग्णालयात सर्व सोयीसुविधा अपलब्ध आहेत. त्यामुळे खर्चीक रुग्णालयात जाण्याची गरज नाही. 

नक्की वाचा - Nashik Crime: लग्नाच्या आमिषाने अत्याचार, घरी एकटी असताना नको ते केलं; अल्पवयीन मुलगी गर्भवती

सध्या रुग्णसेवा मोठ मोठ्या रुग्णालयात प्रचंड महाग झाली आहे. त्यामुळे अशा रुग्णालयात जाताना सर्व सामान्य नेहमी दहा वेळा विचार करतात. त्या पेक्षा सरकारी रुग्णालयात जाण्याकडे त्यांचा कल असतो. पण आता आदिती लाईफ केअर रुग्णालयामुळे महिलांसाठी हक्काचं रुग्णालय झालं आहे. पनवेल आणि परिसरातील महिलांना त्याचा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे सर्व सोयी सुवीधा या रुग्णालयात उपलब्ध असणार आहेत.  

नक्की वाचा - Pune News: पोलीस असल्याचे सांगत महिलेवर अत्याचार, धक्कादायक घटनेनं देऊळगाव हादरले

दरम्यान गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोफत रेल्वे सेवा तसेच टोल माफी देण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले असल्याने नागरिकांना अडचण भासत आहे. त्यामुळे अवजड वाहनांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. कोकणात जाणारे हे केवळ चाकरमानी नाहीत तर खरे कोकणवासी आहेत. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून सरकारकडून ही सुविधा करण्यात आली आहे असं ही त्या यावेळी म्हणाल्या. त्यांनी सर्व महाराष्ट्रातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com