World news: अफगाणीस्तानातून कतारला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी, कारण काय?

World news:गेल्या काही दिवसात अफागाणिस्तानमध्ये 15 लाख लोक इराण आणि पाकिस्तानमधून परत आले आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins

World news: 2021 साली अमेरिकेचं सैन्य अवघ्या आठ दिवसात अफागणिस्तान सोडून निघून गेलं. त्यानंतर तालिबानचं सरकार सत्तेवर आलं. आता या घटनेला पाच वर्ष उलटली आहेत. अफागाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार आता स्थिरावू लागलं आहे. तालिबान सरकार आल्यानंतर पाकिस्तान आणि इराणनं त्यांच्या हद्दीत आलेल्या 15 लाख अफगाणी लोकांना पुन्हा माघारी पाठवलं आहे. त्यातील बहुतांश लोक सरकारी किंवा सेवाभावी संस्थांच्या मदतीवर अवलंबून आहेत. त्यामुळे आता तालिबान सरकारनं कामगार निर्यातीचं धोरण  स्वीकारलं आहे. त्यात अफागाणिस्तानमधून कतारला जाऊ इच्छणाऱ्या कामगारांची मोठी रांग लागली आहे. अफगाणीस्तामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. त्यामुळे विद्यमान तालिबान सरकारनं आखाती देशांमध्ये अफागाण नागरिकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याच प्रयत्नामधून आखाती देशातील कतारमध्ये पाठवण्यासाठी 2 हजार कामगारांची  नोंदणी आणि व्हिसा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. (Large crowd to travel from Afghanistan to Qatar) त्यासाठी भली मोठी रांग लागली आहे. 

नक्की वाचा - US India Trade Deal : अमेरिकेचा टॅरिफ स्टाईक; भारतातील 'या' 5 टॉप प्रॉडक्टला सर्वाधिक फटका

व्हिसासाठी लांबच लांब रांगा 

नजीब बारी हे ही त्यापैकी एक आहेत. त्यांनीही व्हिसासाठीचे अर्ज केला आहे. ते म्हणतात,  मी एक सीव्हिल इंजिनिअर आहे. मी पाकिस्तानमध्ये कामासाठी गेलो होतो. पण तिथे मला जशी पाहिजे, तशी नोकरी मिळाली नाही. त्यामुळे मी परत अफगाणिस्तानला आलो. आज मी व्हिसासाठी रांगेत उभा राहण्याचा  दुसरा दिवस आहे. मला वाटतंय सगळेच गरीब आणि बेरोजगार आहेत. आम्हाला असं कळलं की सरकार लोकांना कतारला कामासाठी पाठवत आहे. आम्हाला तिकडे कामासाठी जायचं आहे. आम्ही सरकारला विनंती करतो की आम्हाला तिकडे पाठवा. जेणेकरुन आमच्या मुलांसाठी आम्हाला पैसे कमावता येतील असं त्यांनी सांगितलं. 

Advertisement

कामगार निर्यात धोरण 

तालिबान सरकारानं आखाती देशांमध्ये कामगारांची निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी  सौदी अरेबिया, युएई, ओमान, तुर्कीए आणि रशिया या देशांशी बातचीत सुरु आहे. कतारशी करार पूर्ण झाला आहे. त्यामुळे कतारचा व्हिसा मिळावा यासाठी अफगाणिस्तानातील 35 प्रांतातून लोक काबूलच्या दिशेने येत आहेत. प्रत्येक अर्जदाराला त्यांची शैक्षणिक पात्रता सिद्ध करावी लागत आहे. सलीमुल्लाहा इब्राहिमी अफगाणीस्तानच्या कामगार मंत्रालयाचे प्रवक्ते आहेत. त्यांनी सांगितलं  की आताची परिस्थिती पाहिली तर कतारच्या सरकारी कंपनीशी आणि एका खासगी कंपनीशी करार करण्यात आला आहे.  दोन टप्प्यात कामगारांची रवानगी कतारमध्ये करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 2000 नोकऱ्या  उपलब्ध होणार आहेत.(Large crowd to travel from Afghanistan to Qatar)  दुसऱ्या टप्प्यात 1 हजार 100 आणखी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत असं ते म्हणाले. 

Advertisement

नक्की वाचा - US India Tarrif: रशियाकडून खरेदी केल्याची भारताला शिक्षा, 25 टक्के टॅरीफसह दंड वसूल करणार

15 लाख कामगार परतले 

गेल्या काही दिवसात अफागाणिस्तानमध्ये 15 लाख लोक इराण आणि पाकिस्तानमधून परत आले आहेत. हे सगळे लोक सध्या बेरोजगार आहे. त्यांच्या कुटुंबियांना पोसणं आता सरकार आणि त्यांना मदत करणाऱ्या मानवाधिकार संस्थांना कठीण होऊन बसलं आहे. माजी लष्करी अधिकारी सतीश ढगे यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. अफागाणिस्तानातील मोठी लोकसंख्या मानवाधिकार संघटनांच्या मदतीवर अवलंबून आहे. पण अमेरिकेकडून या संस्थांना होणारा निधी पुरवठा गेल्या सहा महिन्यात आटला आहे. त्यामुळे अफागाण नागरिकांना खासगी सेवाभावी संस्थामाध्यमातून दिली जाणाऱ्या आरोग्य सेवाही पुरवणं कठीण झालं आहे. 2023 मध्ये अफागाणिस्तानातील तालिबान सरकारचे प्रमुख हिबातुल्लाहा अखुनजादा यांनी 
कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांची भेट घेतली होती. तेव्हापासून अफगाणी लोकांच्या रोजगारासाठी सुरु झालेले प्रयत्न आता दोन वर्षानंतर काहीसे फळाला येताना दिसत आहेत. 
 

Advertisement