
US India Trade Deal: अमेरिकेने भारतावर 25 टक्के टॅरीफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने रशियाकडून वस्तू खरेदी केल्याचीही अमेरिकेने शिक्षा देण्याचे ठेरवले असून टॅरीफ व्यतिरिक्त भारतावर अमेरिकेने दंडही लावण्याचा निर्णय घेतला आहे. 1 ऑगस्टपासून हे टॅरीफ लागू होणार आहेत असे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे.
( नक्की वाचा: थेट डोनाल्ड ट्रम्प यांना भिडली, जगातील सर्वात खतरनाक महिला कोण? )
रशियाकडून तेलखरेदी ही युरोपीय देशांसाठी मोठी समस्या
इतर देशांकडून मिळत असलेले कच्चे तेल महाग असल्याने भारताने रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला युरोपातील काही देशांनी विरोध केला होता, मात्र त्याला न जुमानता भारताने रशियाकडून तेलखरेदी सुरू ठेवली होती. भारताला याबद्दल शिक्षा देण्यासाठी त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचं अमेरिकेने जाहीर केले आहे.
चर्चा सुरू असतानाच टॅरीफची घोषणा
भारत- अमेरिका व्यापार करारासाठीच्या चर्चेचे गुऱ्हाळ गेले तीन साडे तीन महिने सुरु आहे. दोन्ही देशांच्या प्रतिनिधींची यासंदर्भात पाच वेळा चर्चा झाली आहे. चर्चेच्या सहाव्या फेरीसाठी अमेरिकेचं प्रतिनिधीमंडळ ऑगस्ट महिन्यात भारतात येणार आहे. मात्र तोवर थांबण्याची ट्रम्प प्रशासनाची इच्छा दिसत नाही. म्हणूनच ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के लावणार का असा प्रश्न विचारल्यावर त्यावर होकारार्थी उत्तर दिलं.
( नक्की वाचा: रशिया 8.7 तीव्रतेच्या शक्तीशाली भूकंपाने हादरला )
दुग्धजन्य उत्पादनांसाठी भारताच्या बाजारपेठेवर डोळा
भारत आणि अमेरिका यांच्यात मोठ्या प्रमाणात आयात निर्यात होते. व्यापाराचा तराजू भारताच्या बाजूने झुकलेला आहे. म्हणजेच अमेरिकेत भारतीय मालाची आणि सेवांची आयात जास्त होते. त्यामुळे व्यापाराचा तराजू समतोल असावा अशी अमेरिकेची इच्छा आहे.त्यासाठी भारताने कृषी विशेषतः डेअरी उत्पादनं विकण्यासाठी बाजारपेठ खुली करुन द्यावी अशी अमेरिकेची मागणी होती. पण भारतानं या दोन्हीबद्दल कोणतीही तडजोड करण्यास नकार दिला आहे. अमेरिकेतील डेअरी उत्पादनं नॉनव्हेज असल्याने भारत यासाठी तयार नाहीये असं सांगितलं जात आहे.
ट्रम्प यांनी काय म्हटलंय ?
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भारतावर लावण्यात आलेल्या टॅरीफ संदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की,"भारत हा अमेरिकेचा मित्र आहे, मात्र बऱ्याच वर्षांपासून भारत आणि अमेरिकेतील व्यापार कमी होतो, याचं कारण म्हणजे भारताचे टॅरीफ दर हे फार जास्त आहेत.
हे लक्षात ठेवा की भारत आपला मित्र असला तरी, अनेक वर्षांपासून आम्ही त्यांच्यासोबत जास्त व्यापार केलेला नाही. कारण त्यांचे टॅरीफ खूप जास्त आहेत, ते जगातील सर्वाधिक टॅरीफपैकी एक आहेत. तसेच, त्यांचे व्यापारी नियम हे इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त त्रासदायक आहेत.
याशिवाय, भारताने बहुतेक लष्करी सामान रशियाकडून खरेदी केले आहे. चीनप्रमाणे भारत देश रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल विकत घेतो. एकीकडे रशियाने युक्रेनमधील हिंसाचार थांबवावा असे वाटत असताना असे होणे योग्य नाही. यामुळे, भारताला आता 25 टॅरीफ द्यावा लागेल. तसेच, त्यांना वरील गोष्टींसाठी दंडही लागेल, जो 1 ऑगस्टपासून लागू होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world