पोट दुखू लागल्याने तरुण पोहोचला रुग्णालयात, पोटाची अवस्था पाहताच डॉक्टरांनी अख्खं रुग्णालय केलं रिकामी

२४ वर्षांच्या तरुणाची तपासणी करताच संपूर्ण रुग्णालय रिकामं करावं लागलं.

जाहिरात
Read Time: 2 mins

Strange incident : फ्रान्समधील टूलूझ शहरात एका विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण रुग्णालय रिकामं करावं लागलं. एका २४ वर्षीय तरुणाच्या शरीरात पहिल्या महायुद्धाच्या काळातील तोफेचा गोळा सापडल्याने डॉक्टरांसह सुरक्षा यंत्रणांचीही झोप उडाली.

नेमकं काय घडलं?

शनिवारी रात्री उशिरा एका तरुणाला पोटात तीव्र वेदना होत असल्यामुळे टूलूझमधील रंगुइल रुग्णालयात (Rangueil Hospital) दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी जेव्हा त्याची तपासणी केली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. रुग्णाच्या शरीराच्या खालच्या भागातून आत गेलेला एक ८ इंच लांब आणि १ इंच रुंद टोकदार तोफेचा गोळा सापडला. हा गोळा त्याच्या पोटात अडकला होता.

Advertisement

रुग्णाच्या शरीरातील तोफेचा गोळा धोकादायक असू शकतो. या भीतीने रुग्णालय प्रशासनाने तातडीने अग्निशमन दल आणि बॉम्ब शोधक पथकाला पाचारण केलं. सुरक्षेच्या कारणास्तव रुग्णालयाचा परिसर रिकामे करून घेण्यात आला.  तपासाअंती हा गोळा धोकादायक नसल्याचे स्पष्ट झाले. तज्ज्ञांनी तो गोळा ताब्यात घेतला असून रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

नक्की वाचा -  हातात बंदूक, चेहऱ्यावर हसू! पाकिस्तानी सैन्याला भिडणाऱ्या 'त्या' तरुणीचा शेवटचा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

हा गोळा शरीरात कसा गेला?

हा तरुण फ्रान्सचा नागरिक असून त्याच्या शरीरात हा गोळा कसा गेला, याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही. तज्ज्ञांच्या मते, एखाद्या पार्टीत स्टंट करण्याच्या नादात हा गोळा त्याच्या शरीरात गेला असावा. हा गोळा १९१८ मधील म्हणजेच पहिल्या महायुद्धाच्या काळातील 'इम्पेरियल जर्मन आर्मी'ने वापरलेला होता, अशीही माहिती आहे. आज तकने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. या तरुणाने हा ऐतिहासिक आणि धोकादायक गोळा आपल्याकडे का ठेवला होता, याची चौकशी पोलीस करणार आहेत. अशी स्फोटकं किंवा दारुगोळा बेकायदेशीरपणे जवळ बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. सध्या हा तरुण शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातच उपचार घेत आहे.

Topics mentioned in this article