
Worlds most scariest movie : हॉरर चित्रपट पाहण्याची एक वेगळीच मजा असते. या चित्रपटात रहस्य असतं. काही चित्रपटं इतके भीतीदायक असतात की ते पाहताना बोबडी वळते. तुम्ही चुकून एखादा हॉरर सिनेमा रात्री पाहिला तर वॉशरुमध्ये जातानाही भीती वाटू लागते. भीतीनं झोप येत नाही.
सध्या हॉरर चित्रपटामध्ये कॉमेडीचा तडका टाकला जात आहे. त्यामध्ये भीतीदायक प्रसंग कमी आणि कॉमेडीवर भर दिला जातोय. यापूर्वी असं नव्हतं. त्यावेळी हॉरर चित्रपट फक्त भीतीदायक असतं. आता आम्ही तुम्हाला एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, तो चित्रपट तुम्ही चुकूनही एकट्यानं पाहू नका. कारण, गूगलनुसार हा जगातील सर्वात भीतीदायक चित्रपट आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जगातील सर्वात भीतीदायक चित्रपट
आम्ही ज्या चित्रपटाबद्दल तुम्हाला सांगणार आहोत तो 52 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. हा आजही जगातील सर्वात भीतीदायक चित्रपट मानला जातो. गूगलवर जगातील सर्वात भीतीदायक चित्रपट असं सर्च केलं तर याच चित्रपटाचं नाव येतं.
या चित्रपटाला एक प्रकारे शापित मानलं जातं. 1973 साली प्रदर्शित झालेल्या या सर्वात भीतीदायक चित्रपटाचं नाव आहे, 'द एक्सॉर्सिस्ट'. विल्यम पीटर यांच्या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. हा चित्रपट पाहून अनेकांना मोठा धक्का बसला होता. इंग्लंड, आयर्लंड, स्कॉटलंडसह अनेक देशांमध्ये या चित्रपटाला बंदी घालण्यात आली होती. IMDb वर या चित्रपटाचं रेटिंग 8.2 आहे.
( नक्की वाचा : Chhaava : छावा चित्रपटावर शिर्के कुटुंबीय आक्रमक, दिग्दर्शकाला राज्यात फिरु न देण्याचा इशारा )
काय आहे कथा?
'द एक्सॉर्सिस्ट' चित्रपटाची कथा अतिशय भीतीदायक आहे. यामध्ये एका लहान मुलीचा ताबा वाईट आत्मा घेते. या मुलीची आई एक अभिनेत्री आहे. ती मुलीच्या विचित्र कृतींमुळे त्रस्त असते. ती मुलीला एका पाद्रीला दाखवते. त्यांच्या मदतीनं मुलीला पछाडलेल्या भूताचा नायनाट करते. या चित्रपटात एक-एक प्रसंग थरकाप उडवणारा आहे.
या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान अनेक अजब घटना घडल्या होत्या. या चित्रपटाच्या सेटवर आग लागली होती. त्यामध्ये काही क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला. तर चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर एका प्रेक्षकाला हार्ट अटॅक आला होता. हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर उपलब्ध आहे. 104.96 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या चित्रपटानं 3,858.94 कोटी रुपयांची भक्कम कमाई केली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world