जगातील सर्वात वयस्कर जीव! 8 ब्रिटिश राजे आणि 40 अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पाहणारा 'जोनाथन' नक्की आहे तरी कोण?

World's Oldest Living Animal : ऐकायला हे एखाद्या कल्पनेसारखे वाटत असले तरी हा जगातील सर्वात वयस्कर जीव आजही या पृथ्वीवर जिवंत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
World's Oldest Living Animal : त्याने टनचे 8 राजे-राण्या आणि अमेरिकेचे तब्बल 40 राष्ट्राध्यक्ष बदलताना पाहिले आहेत. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:


World's Oldest Living Animal: विचार करा, या पृथ्वीवर असा कोणता जीव असू शकतो ज्याने पॅरिसचा आयफेल  टॉवर किंवा न्यूयॉर्कचा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी उभारताना पाहिले असेल? एवढेच नाही तर पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचा काळ अनुभवत ब्रिटनचे 8 राजे-राण्या आणि अमेरिकेचे तब्बल 40 राष्ट्राध्यक्ष बदलताना पाहिले आहेत. ऐकायला हे एखाद्या कल्पनेसारखे वाटत असले तरी हा जगातील सर्वात वयस्कर जीव आजही या पृथ्वीवर जिवंत आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने अधिकृतपणे जागतिक आयकॉनचा दर्जा दिलेला हा जीव कोणताही माणूस नसून, एक अवाढव्य कासव आहे, ज्याचे नाव जोनाथन आहे.

अविश्वसनीय 194 वर्षे पूर्ण

जोनाथन हा सेशेल्स प्रजातीचा एक विशालकाय कासव आहे. सामान्यतः या प्रजातीच्या कासवांचे आयुष्य 150 वर्षांपर्यंत असते. मात्र, जोनाथनने 2026 मध्ये आपल्या आयुष्याची अविश्वसनीय अशी 194 वर्षे पूर्ण केली आहेत. 

Advertisement

आजच्या घडीला तो जगातील सर्वात जास्त जगणारा जमिनीवरील प्राणी ठरला आहे. हा अद्भूत जीव सध्या दक्षिण अटलांटिक महासागरातील सेंट हेलेना या बेटावर अतिशय दिमाखात आणि सुरक्षितपणे जगत आहे.

1832 मध्ये झाला होता जन्म

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या माहितीनुसार, जोनाथनचा जन्म साधारणपणे 1832 मध्ये झाला होता. तो काळ विक्टोरियन युग, लंडनचा टॉवर ब्रिज आणि पेरिसच्या एफिल टॉवरच्या निर्मितीच्याही आधीचा आहे. स्थानिक लोक जोनाथनला प्रेमाने ओल्ड जोनो म्हणून हाक मारतात. जोनाथनने ब्रिटनचे राजे किंग विल्यम IV यांच्या राजवटीपासून ते सध्याचे राजे किंग चार्ल्स III यांच्यापर्यंत एकूण 8 ब्रिटिश राजघराण्यांचा काळ पाहिला आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू यांच्यापासून ते आतापर्यंतच्या 40 पेक्षा जास्त राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ त्याच्या आयुष्यात बदलला आहे.

( नक्की वाचा : भारताचा सातवा दरवाजा ते मेक्सिकोचे पाताल लोक; या 7 जागा उघडण्याचं धाडस कोणतंही सरकार का करत नाही? )
 

वैद्यकीय क्षेत्रासाठी आश्चर्य

वय जास्त झाल्यामुळे जोनाथनची वास घेण्याची क्षमता आता कमी झाली आहे. मात्र, तिथले पशुवैद्यकीय अधिकारी सांगतात की जोनाथनची प्रकृती अजूनही उत्तम आहे आणि त्याला भूकही चांगली लागते. सर्वात मनोरंजक बाब म्हणजे, जोनाथनच्या शरीरातील सेल्स म्हणजेच पेशी मानवी पेशींप्रमाणे म्यूटेट होत नाहीत, म्हणजेच वेगाने नष्ट होत नाहीत. त्यामुळेच शास्त्रज्ञ आणि डॉक्टर्स त्याच्या डीएनएचा सखोल अभ्यास करत आहेत, जेणेकरून त्याच्या या दीर्घायुष्याचे रहस्य वैद्यकीय क्षेत्राला समजून घेता येईल.

पाहा VIDEO

Topics mentioned in this article