जाहिरात
This Article is From May 09, 2024

Jalebi Baba: 100हून अधिक महिलांवर बलात्कार करणाऱ्या जलेबी बाबाचा मृत्यू

Jalebi Baba News: जलेबी बाबा याला 100 हून अधिक महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली होती. कोण आहे हा जलेबी बाबा? नेमके काय आहे हे प्रकरण?

Jalebi Baba: 100हून अधिक महिलांवर बलात्कार करणाऱ्या जलेबी बाबाचा मृत्यू

Jalebi Baba News: बिल्लू उर्फ जलेबी बाबा याचा हरियाणातील हिसार तुरुंगात मृत्यू झाला आहे. जलेबी बाबा याला 100 हून अधिक महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली होती. तो 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत होता. जलेबी बाबाने महिलांवर बलात्कार करताना व्हिडीओ देखील चित्रीत केले होते. जलेबी बाबा उर्फ ​​बिल्लू अमरपुरी असे त्याचे पूर्ण नाव असून तो हिसार येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. चहामध्ये गुंगीचे औषध मिसळून जलेबी महिलांना बेशुद्ध करायचा. यानंतर तो त्यांच्यावर बलात्कार करायचा आणि त्याचे व्हिडीओ चित्रीकरणही करायचा. जलेबीची बुधवारी (8 मे 2024) प्रकृती अचानक बिघडली होती. ज्यामुळे त्याला अग्रोहा सरकारी रुग्णालयात उपचार दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर जलेबीला मृत घोषित केले होते. 

(नक्की वाचा: बेशुद्ध झाला तरी एसटी थांबवली नाही; प्रवाशाच्या मृत्यूनंतर बस आगारात गोंधळ)

आश्रमात येणाऱ्या महिलांना करायचा लक्ष्य

Latest and Breaking News on NDTV

जलेबी बाबा तंत्रमंत्राच्या नावाखाली महिलांना गुंगीचे औषध पाजून त्यांना बेशुद्ध करायचा आणि नंतर त्यांच्यावर बलात्कार करायचा. किमान 120 महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप जलेबी बाबावर होता. जलेबी व्हिडीओ चित्रीत करायचा आणि त्याच्या सीडी बनवायचा. पोलिसांना कारवाईदरम्यान या सीडी देखील सापडल्या होत्या. जुलै 2018मध्ये या बाबाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यानंतर हे प्रकरण सर्वांसमोर आले.   

(नक्की वाचा: विद्यार्थिनींचे खासगी व्हिडीओ काढून केले व्हायरल; पुण्याच्या प्रसिद्ध कॉलेजातील धक्कादायक प्रकार)

वर्ष 2018मध्ये गुन्हा दाखल झाला होता

जलेबीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हरियाणातील  टोहानातील नागरिक संतप्त झाले होते. तिथल्या लोकांनी जलेबीविरोधात अनेकदा आंदोल केले. या आंदोलनांमुळे पोलिसांनी जलेबी बाबाविरोधात अखेर गुन्हा नोंदवला. 19 जुलै 2018 रोजी हा गुन्हा नोंद करण्यात आला होता. 1 नोव्हेंबर 2020 रोजी जलेबी बाबाविरोधात 200 पानी आरोपपत्र सादर करण्यात आले होते.  या कालावधीत 20 जणांची साक्ष घेण्यात आली होती, ज्यामध्ये अल्पवयीन मुली, पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिकच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. 

(नक्की वाचा: शाळकरी मुलांनी रिल्ससाठी चोरल्या महागड्या कार, एका चुकीमुळं फुटलं बिंग)

पोलिसांनी जलेबी बाबाच्या आश्रमावर छापा टाकला तेव्हा त्याच्या खोलीतून अंमली पदार्थही सापडले होते. त्यामुळे त्याच्याविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

VIDEO: Amol Kiritikarयांच्या प्रचारसभेत 1993च्या स्फोटातील आरोपी इकबाल मुसा?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com