जाहिरात

कोकणवासियांसाठी खुशखबर! मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी 1 मार्चपासून सेवेत; चेक करा वेळापत्रक आणि तिकीट

Mumbai-Vijaydurg Ro-Ro Ferry: 1 मार्चपासून मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान 'एम2एम प्रिन्सेस' (M2M Princess) रो-रो फेरी सेवा सुरू होत आहे. या सुविधेमुळे कोकणातील पर्यटन आणि व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे.

कोकणवासियांसाठी खुशखबर! मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी 1 मार्चपासून सेवेत; चेक करा वेळापत्रक आणि तिकीट

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांसाठी जलमार्गाचा एक नवा आणि आरामदायी पर्याय उपलब्ध झाला आहे. मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान चालणाऱ्या रो-रो फेरी सेवेला 1 मार्च 2026 पासून सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे, या सेवेच्या पहिल्या दिवशी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे स्वतः मुंबई ते विजयदुर्ग असा प्रवास करून या सुविधेचे उद्घाटन करणार आहेत.

प्रवासाचे वेळापत्रक आणि वेळ

प्रस्तुत वेळापत्रकानुसार, 'एम2एम प्रिन्सेस' ही फेरी मुंबईहून सकाळी 8 वाजता सुटेल आणि दुपारी 3 वाजता विजयदुर्गला पोहोचेल. परतीचा प्रवास विजयदुर्गहून दुपारी 12 वाजता सुरू होऊन सायंकाळी 7 वाजता मुंबईत संपेल. हा प्रवास साधारण 7 तासांचा असणार आहे.

मार्च 2026 मधील फेरीच्या तारखा 

मुंबई ते विजयदुर्ग: 1, 4, 7, 11, 14, 18, 21 आणि 25 मार्च.
विजयदुर्ग ते मुंबई: 2, 5, 8, 12, 15, 19, 22 आणि 26 मार्च.

मुंबई-विजयदुर्ग रो-रो प्रस्तावित दर? 

  • इकॉनॉमी : 2,500 रु.
  • प्रिमीयम इकॉनॉमी : 4,000 रु.
  • बिझनेस क्लास : 7,500 रु.
  • फर्स्ट क्लास : 9,000 रु.
  • बाईक : 1,000 रु.
  • सायकल : 600 रु.
  • चारचाकी : 6,000 रु.
  • बस : 13,000 ते 21,000 रु.

(नक्की वाचा-  VIDEO: "लोक नगरसेवक व्हायच्या आधीच...", मुरलीधर मोहोळांनी स्वत: लावला नगरसेवकाच्या ऑफिसचा बोर्ड)

पर्यटन आणि व्यापाराला मिळणार बळ

रस्त्यावरील वाहतुकीच्या तुलनेत जलमार्ग हा अधिक वेगवान आणि सुखकर पर्याय ठरणार आहे. यामुळे कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल आणि स्थानिक व्यापारालाही नवी उभारी मिळेल. तसेच, लांब पल्ल्याच्या बस किंवा खाजगी वाहनांच्या प्रवासाला हा एक उत्तम पर्याय प्रवाशांसमोर उपलब्ध झाला आहे.

प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना

सर्व प्रवाशांनी बोट सुटण्याच्या वेळेच्या किमान 90 मिनिटे आधी बंदरावर पोहोचणे बंधनकारक आहे. ही सेवा हवामान स्थिती, बंदराची परिस्थिती आणि तांत्रिक मंजुरीवर अवलंबून असेल.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com